spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तक्रार निवारण प्रणालीची माहिती देण्याकरिता नगरसेवकांचे झोन निहाय अभ्यास वर्ग घ्यावे

– स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी केली सीओसी केंद्राची पाहणी

नागपूर :- सर्व नगरसेवकांना नागपूर महानगरपालिकेच्या तक्रार निवारण प्रणालीची माहिती मिळावी याकरिता त्यांचे झोन निहाय अभ्यासवर्ग घेण्यात यावे अशी सूचना मनपाच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी दिली.

नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती शिवानी दाणी आणि अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी मनपा मुख्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर (सीओसी) ला भेट देत कार्यपद्धतीचा आढावा घेतला. याप्रसंगी उपायुक्त मिलिंद मेश्राम, माहिती तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी योगेश लुंगे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

सीओसी केंद्रात नागपूर महानगरपालिकेद्वारे तक्रार निवारणासाठी तयार करण्यात आलेल्या तक्रार निवारण प्रणाली, हेल्पलाईन, आपली बस सेवा वाहतूक प्रणाली व स्वच्छता कर्मचाऱ्यांची हजेरी प्रणाली आदी बाबत स्थायी समिती सभापती शिवानी दाणी आणि अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी. यांनी आढावा घेतला. तक्रार निवारण हेल्पलाईन १५५३०४ या हेल्पलाईनकरिता नियुक्त कर्मचाऱ्यांशी दाणी यांनी चर्चा केली.

यावेळी बोलताना दाणी यांनी नागरिकांची प्रत्येक तक्रार ही महत्वाची असून, त्यावर योग्य कार्यवाही होण्याकरिता तक्रार निवारण हेल्पलाईन यंत्रणेमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, या प्रणाली बाबत सर्व नगरसेवकांना माहिती मिळावी, तसेच त्यांचे रजिस्ट्रेशन करून त्यांना आयडी देण्यात यावा अशी सूचना ही दाणी यांनी यावेळी केली. याशिवाय सर्व नगरसेवकांनाचे झोन निहाय अभ्यासवर्ग घेण्यात घेऊन त्यांना प्रणालीची संपूर्ण माहिती देण्यात यावी असेही दाणी यांनी सुचविले.

नागरी समस्यांच्या जलद निराकरणाच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिका द्वारे तक्रार निवारण हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे. तसेच विविध माध्यमातून मनपाला तक्रारी प्राप्त होत असतात. याबाबतची माहिती तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे यांनी दाणी यांना दिली. मनपाला विविध माध्यमातून जानेवारी २०२६ पासून आजवर ६,१२७ तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहेत. तक्रार निवारणासाठी मनपा मुख्यालयातील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर (सीओसी)मध्ये दोन पाळ्यांमध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांद्वारे आलेल्या फोनला तात्काळ प्रतिसाद देणे, तक्रारकर्त्यांकडून सविस्तर माहिती घेणे, तक्रार संबंधित विभागाकडे पाठविणे आणि तक्रारीवरील कार्यवाही नंतर तक्रारकर्त्यांकडून प्रतिसाद मागविण्याची जबाबदारी आहे. तर योगेश लुंगे यांनी आपली बसच्या संदर्भात माहिती दिली. मनपाकडे ५५३ बसेसे असून, १२० मार्गांवर या बसेसे धावत आहेत. फेब्रुवारी महिन्यात दिवसाला साधारणता १ लाख ४६ हजार प्रवासी प्रवास करत असल्याचे लुंगे यांनी सांगितले.

Popular Articles