स्वच्छ महाराष्ट्र अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मुख्याधिकारी विनोद जाधव, नगर परिषद कामठी व नगराध्यक्ष अजय रुपनारायण अग्रवाल, नगर परिषद कामठी यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद कामठी येथील सफाई कामगार तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर आरोग्य शिबिर दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत कामठी येथील UPHC (Urban Primary Health Centre) येथे पार पडले. या शिबिरामध्ये नगर परिषद कामठीचे सफाई कामगार तसेच अधिकारी व कर्मचारी यांची विविध संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात आली.
या आरोग्य शिबिराला प्रथम उपस्थिती रमा नागसेन गजभिये, स्वच्छता सभापती, रत्नमाला फटिंग, उपमुख्याधिकारी, लीना इंगोले, स्थापत्य अभियंता, विरेंद्र ढोके, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता, सतीश उरकुडे, विद्युत अभियंता, जितेंद्र चवरे, विद्युत अभियंता, महेश चौबे, कार्यालय अधीक्षक, राजेश्वरी दळवी, रचना सहाय्यक, चेतन तुरणकर, लेखापाल, सुशांत जगताप, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, अश्विनी भिवगडे, रचना सहाय्यक तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर आरोग्य शिबिर डॉ. शबनन खानुनी व त्यांच्या वैद्यकीय टीमच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले. शिबिरामध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
नगर परिषद कामठी मार्फत अशा प्रकारच्या आरोग्यविषयक उपक्रमांमुळे सफाई कामगार तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत होत असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.








