spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्यसेवा देण्याचा मागणीचा विचार करणार – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई :- राज्यातील शिक्षकांना पोलीस विभागाप्रमाणे कॅशलेस आरोग्य सेवा देण्याच्या मागणीचा विचार केला जाईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.

राज्यातील अनुदानित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती संदर्भात सदस्य विक्रम काळे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, सुधाकर आडबाले, निरंजन डावखरे, किरण सरनाईक यांनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले, शिक्षकांसह शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू असून राज्यात पोलीस विभागाशिवाय इतर विभागांमध्ये अशी कॅशलेस व्यवस्था लागू नाही. मात्र सदस्यांनी केलेल्या मागणीचा विचार करून याबाबत निर्णय घेतला जाईल.

शिक्षकांची वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयके त्या त्या महिन्यात पारित होण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले

Popular Articles