spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आजची स्त्री ही स्वतःच्या अस्तितवाप्रति जागृत – डॉ सुनील वाघमारे

कामठी :- मुलगी म्हटलं की अनेक बंधने येतात .अंधार होण्यापूर्वी घरी परतलेच पाहिजे, कुणासोबतं जास्त बोलू नये, जास्त फिरू नये अशी समज होऊन बसली आहे परंतु वेळ पडल्यास हीच घरातील लक्ष्मी गुन्हेगाराचा नायनाट करण्यासाठी दुर्गेचे रूप देखील घेऊ शकते .भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन चालणारे महिला आज समोरघडीला जात असून कामठी तालुक्याचा विचार केल्यास कामठी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात महिला राज दिसून येत असल्याचे मौलिक मत कांग्रेस सेवादल चे कामठी शहर अध्यक्ष डॉ सुनील वाघमारे यांनी 8 मार्च जागतिक महिला दिन निमित्त शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आयोजित सत्कार कार्यक्रमात व्यक्त केले. याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षिका डॉ निशात शेख यांचा कांग्रेस सेवादल अध्यक्ष डॉ सुनील वाघमारे व सदस्य गण यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी राजकुमार गेडाम, विपिन गायकवाड, पंकज खोब्रागडे, कंचन मंडपे, रुपाली मंडपे, सोहेल अंजुम, प्रकाश लाइनपांडे, आदी मान्यवर उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.