spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शिवशक्तीनगर नंबर 2 मध्ये, सकल हिंदू समाजा च्यावतीने दोन दिवशीय हिंदू संमेलनाचे आयोजन 14 व 15 मार्च रोजी

नागपूर :- दक्षिण नागपूर येथील मानेवाडा रिंग रोड वरील श्री हनुमान मंदिर शिवशक्तीनगर नंबर 2 नागपूर यांच्यावतीने शनिवारी 14 मार्च आणि रविवारी 15 मार्च रोजी सायंकाळी 4 ते 8 वाजतापर्यंत सकल हिंदू संमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे विशेष महत्त्व म्हणजे संपूर्ण देशातील हिंदू समाज एकत्रित, संघटित, आणि आत्मबलसंपन्न बनण्यासाठी समाज जागृतीसाठी या पवित्र उद्देशाने विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

हिंदू समाजाची जनजागृती संघटन एकत्रित करणे व भारत मातेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक मातेने, युवकांनी, युवतीने, हिंदू समाजासाठी एकत्रित यावे. तरुणांनी राष्ट्रीय व सामाजिक कर्तव्य पार पाडावे यासाठी या संमेलनात उपस्थित राहावे अशी नम्र विनंती केली जात आहे.

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत संत श्री महादेव महाराज (आनंदगढ काटोल) तथा श्रीकांत चितळे (नागपूर) व कीर्ती काळमेघ (वनकर) यांची उपस्थिती लाभणार आहे.

शनिवारी 14 मार्च रोजी दुपारी 3 ते 5 या दरम्यान चित्रकला, रांगोळी, सायंकाळी ६ वाजता. हनुमान चालीसा पठण व आरती, पथनाट्य, वकृत्व सादरीकरणाचे आयोजन केले आहे.

दुसऱ्या दिवशी रविवारी 15 मार्च रोजी सकाळी 8:30 ते १०ः३० या दरम्यान, श्री संत गजानन महाराजांचे पारायण नंतर दुपारी ३:३० ते ६ पर्यंत शोभायात्रा आणि सायंकाळी ६ः३० ते ८ पर्यंत समारोपीय कार्यक्रम आणि लगेच प्रसादाचे वितरण करण्यात येईल. असे संयोजकानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Popular Articles