spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तेलाचे जहाज सुखरूप दाखल

– पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आ. प्रताप अडसड यांनी केले सरकारचे अभिनंदन

सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचे जहाज मुंबई सुखरूप दाखल झाल्याबद्दल अधिवेशनादरम्यान आमदार प्रताप अडसड यांनी सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सरकारचे अभिनंदन केले.

यावेळी ते म्हणाले की , अमेरिका आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग भीतीच्या छायेत असताना सौदी अरेबियातून 1 लाख 35 हजार टन कच्चे तेल घेऊन निघालेले ही जहाज होमुर्जच्या खाडीतून सुखरूप भारतात दाखल झाले आहे. जहाजातील कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिताफीने नामिबिया देशाचा झेंडा लावून चलाखीने हल्ल्यांपासून बचाव केला.

कर्मचाऱ्यांच्या चातुर्याबद्दल आणि सरकारच्या पाठिंब्याबद्दल आ. प्रताप अडसड यांनी कर्मचारी भारत सरकार आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले.

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार प्रताप अडसड तसेच प्रवीण दटके यांच्या मागणीला अनुमोदन देत असल्याचे मत व्यक्त केले.

Popular Articles