spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपाच्या नारी शक्तीचा सन्मान – महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते सत्कार

– मनपा महिला सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव आणि खेळ रंगले

नागपूर :-  जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून मनपाच्या नेहरूनगर झोन अंतर्गत येणाऱ्या नंदनवन येथील राजीव गांधी सभागृहात (ता.12) नारी लीड्स स्वच्छता अभियानांतर्गत महिला सफाई कर्मचाऱ्यांचा महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपमहापौर लिला हाथीबेड,जलप्रदाय विशेष समितीच्या सभापत दिव्या धुरडे, सीमा ढोमने, शारदा सुरेश बारई, रजनी वानखेडे, वर्षा डोंगरे, तसनिस परविन नियामत खान काजी, झोनचे सहायक आयुक्त विकास रायबोले, विभागीय अधिकारी आनंद खोडस्कर यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांचा सत्कारच नव्हे, तर त्यांच्याकरिता संगीत खुर्ची आणि मटका फोड यांसारख्या खेळ आयोजित करण्यात आले. या खेळांत महिला सफाई कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग महिलांनी आनंद लुटला. या प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कारामुळे महिला सफाई कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले व त्यांच्या योगदानाचा समाजासमोर गौरवपूर्ण सन्मान झाला. महिला सक्षमीकरण आणि स्वच्छतेबाबत जनजगृतीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने हा कार्यक्रम एक स्तुत्य पाऊल ठरले.

Popular Articles