spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भारतीय बौद्ध महासभे तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी अभिवादन सभा संपन्न

नागपूर :- भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने 10 मार्च रोजी, जागतिक महिला दिन व माता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारतीय बौद्ध महासभेच्या नागपूर महानगर महिला शाखेच्या पपीता खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे वरिष्ठ इंजि. पद्माकर गणवीर व भीमराव फुसे यांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून पुष्पा बौद्ध, सरोज आगलावे, संघमित्रा ढोके, शितल वाघमारे, किरण गौरखेडे यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. तसेच यावेळी समाजातील काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सत्कारात मोमोन्टो व प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी 300 ते 400 महिलांची उपस्थिती लाभली होती. संचालन माधुरी पाटील यांनी केले तर सर्वांचे आभार ॲड. आकांक्षा वानकर यांनी मानले.

Popular Articles