spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिव्यांग लाभार्थ्यासाठी युडीआयडी कार्ड अनिवार्य – तहसीलदार कोळपे 

– दिव्यांग निराधार लाभार्थींना मिळणार दरमहा २५०० रुपये 

– यूडीआयडी अन्‌ आधार कार्ड संलग्न नसल्यास मिळणार नाही लाभ

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- दिव्यांग लाभार्थ्यांसाठी यूडीआयडी कार्ड अनिवार्य करण्यात आले असून रामटेक तालुक्यातील सर्व दिव्यांगांनी आपले यूडीआयडी कार्ड आधार कार्डशी संलग्न करून आवश्यक कागदपत्रे २५ मार्च २०२६ पूर्वी संबधीत ग्राम महसूल अधिकारी किंवा महसूल सेवकांकडे जमा करावे, असे आवाहन तहसीलदार रमेश कोळपे यांनी दिव्यांगांना केलेले आहे व ते बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड संबधीत योजनेशी तीन महिन्यात संलग्न करणे आवश्यक आहे. तसेच १५ सप्टेंबर २०२५ च्या आदेशानूसार विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना मासिक अर्थसहाय्य १५०० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आले असून हे डीबीटी प्रणालीव्दारे थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाते.तसेच तहसिल कार्यालय रामटेक संजय गांधी योजना शाखेत सुध्दा युडीआयडी कार्ड व आधार कार्ड जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निर्धारीत मुदतीत युडीआयडी कार्ड व आधार कार्ड जमा न केल्यास लाभार्थ्यांचे अनुदान बंद होऊ शकते. त्यामुळे संजय गांधी योजना यांचा लाभ घेण्या-या सर्व दिव्यांगांनी ही प्रक्रिया तात्काळ पुर्ण करावी असे आवाहन तहसीलदार रमेश कोळपे यांनी केले आहे.

Popular Articles