नागपूर :- १० मार्च रोजी जागतिक महिला दिना निमित्त आशिर्वाद नगर, NIT गार्डन येथे मिसेस MLA सविता मते, आणि ज्योती देवघर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात परिसरातील मोठ्या संख्येने महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिलांच्या सन्मान, सशक्तीकरण आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे आयोजक अक्षय प्रमोद पिल्लिवार आणि हर्षिता अक्षय पिल्लिवार यांनी उत्तम नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. त्यांच्या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला आणि महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.








