spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

….अखेर नरभक्षक टीयुआय-२२ वाघ जेरबंद

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- तालूक्यातील देवलापार वनपरिक्षेत्र (प्रादे) अंतर्गत येणार्‍या परिसरामध्ये वारंवार पाळीव जनावरांची शिकार करणाऱ्या आणि सावरागाव परिसरात मुक्ता जुगड्या मरसकोल्हे (३५) या महिलेला ठार करून तिचे पती जुगड्या मरसकोल्हे (४०) यांना (दि.२०) फेब्रुवारी ला गंभीर जखमी केले होते. ठार करणारा नरभक्षक टीयुआय-२२ (नर) वाघ अखेर वनविभागाने जेरबंद केला. वाघ टीयुआय -२२ (नर) हा देवलापार वनपरिक्षेत्रातील शेत शिवार परिसरात वावर असल्याने मोठ्या प्रमाणांत शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शेतीची कामे खोळंबलेली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी देवलापार (प्रादे) यांनी स्थानिक पातळीवर सभा घेवून ग्रामपंचयात सरपंच वडांम्बा यांनी दिलेल्या ठराव व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या पाठपूरावा नुसार तात्काळ टीयुआय-२२ (नर) या वाघाला जेरबंद करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविला होता. मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी (दि.२५) फेब्रुवारीला वाघाला जेरबंद करण्यास परवानगी दिली. उपवनसंरक्षक (प्रादे) नागपूर डॉ. विनीता व्यास, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास- १) रामटेक जि. एफ. लुचे, यांचे मार्गदर्शनाखाली मंगळवार (दि. १०) कारवाई करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी, देवलापार (प्रादे), एस. बी. टुले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल चौरागडे वनपरिक्षेत्र अधिकारी पूर्व पेंच पिपरीया, विवेक राजुरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी (एक. नियंत्रण), लक्ष्मीकांत ठाकरे , व वनपरिक्षेत्र अधिकारी, पवनी (प्रादे) सागर बनसोड तसेच वनपरिक्षेत्र देवलापार (प्रादे) येथील क्षेत्र सहाय्यक सोनकुसळे, ए. व्ही. जनवार, पी. टी. मेश्राम, तसेच वनरक्षक प्रदीप पवार, आर. आर.पचारे, के. आर. राडुत, सि. डी. बनसोड, आर. जे. पिंपलवार, कैलास मरसकोल्हे यांच्या पथकाने दुपारी ३ वाजता पासुन वन्यप्राणी वाघ टीयुआय- २२ (नर) चा शोध घेवून वनकक्ष क्रं. ४८५ राखीव वन येथे सायंकाळी ६ वाजता ट्रांक्युलाईझ करुन वाघाला पकडले. त्यानंतर ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटर, नागपूर येथे पाठविण्यांत आले.

Popular Articles