Friday, March 13, 2026
spot_imgspot_img
spot_img

अवैध रेती वाहतूक प्रकरणी २ गुन्हे नोंद; वाहनासह ₹६१.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नरखेड :- नरखेड पोलीस पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, अवैधरित्या रेती ची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी मौजा बेलोना शिवारात नाकाबंदी करून वाहन कं. १) दहा चक्का टिप्पर क्र. एम एच ४० वी एफ ८४५५ आणि वाहन कं २) १२ चक्का टिप्पर क्रमांक एम एच ४० डी सी २१८० या वाहनांना थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळुन आली. टिप्पर क्र. एम एच ४० बी एफ ८४५५ चा चालक आरोपी नामे १) आकाश उमेशराव धुर्वे, वय २५ वर्ष, रा. हिवरखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती सोबत क्लिनर आरोपी २) साहिल ईश्वर गिरी, वय २५ वर्ष, रा. पुसला ता. वरूड, जि. अमरावती हे जागीच मिळुन आले. सदर ८ ब्रास रेती मिळुन आली. वाहनामध्ये परवान्यापेक्षा जास्त रेती वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले. तसेच १२ चक्का टिप्पर क्रमांक एम एच ४० डी सी २१८० चा चालक नामे १) साहिल अश्फाक दिवाण, वय २१ वर्ष, सोबत आरोपी क्रमांक क्लिनर नामे २) शोहेब मोहम्मद अली शेख वय २२ वर्ष हे मिळुन आले. सदर टिप्पर मध्ये १० ब्रास रेती विनापरवाना वाहतुक करतांना मिळुन आले. वाहन मालकाचे नाव ३) दीपक बेले, सर्व रा. मोवाड तह. नरखेड असे असल्याची माहीती प्राप्त झाली. पोलीसांनी पंचासमक्ष वर नमुद १) दोन्ही वाहने किंमती ६०००,०००/- रूपये २) दोन्ही वाहनामधील एकुण १८ ब्रास रेती किंमती १,२६,०००/- रूपये मुद्देमाल असा एकुण ६१,२६,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदर प्रकरणी टिप्पर क्र. एम एच ४०बी एफ ८४५५ चा चालक नामे १) आकाश उमेशराव धुर्वे, वय २५ वर्ष, रा. हिवरखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती २) साहिल ईश्वर गिरी, वय २५ वर्ष, रा. पुसला, ता. वरूड, जि. अमरावती आणि नमुद वाहनाचा मालक यांच्या विरूध्द १ गुन्हा आणि टिप्पर क्रमांक एम एच ४० डी सी २१८० १) साहिल अश्फाक दिवाण, वय २१ वर्ष, सोबत क्लिनर नामे २) शोहेब मोहम्मद अली शेख, वय २२ वर्ष, ३) वाहन मालक नामे दीपक बेले, सर्व रा. मोवाड तह. नरखेड यांच्या विरूध्द १ गुन्हे असे कलम ३०३(२), ४९, १९४ भा.न्या.सं अन्वये २ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com