spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

थकीत घरकरावर २ टक्के प्रतिमहिना व्याजा विरोधात नागरिकांचे निवेदन

कन्हान :- नगरपंचायत कांद्री (कन्हान) प्रशासनाने थकीत घर कर व इतर करांवर २ टक्के प्रतिमहिना व्याज आकारण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णया विरोधात स्थानिक नागरिकांच्या वतीने नगर पंचायत च्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

सध्याच्या आर्थिक परिस्थितीत अनेक नागरिक आर्थिक अडचणीतुन जात आहेत. अशा वेळी थकीत करांवर २ टक्के प्रतिमहिना दराने व्याज आकारणे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी जाचक ठरणार आहे. त्या मुळे हा निर्णय तत्काळ कमी करावा किंवा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नियमित पणे कर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलत योजना जाहीर करावी. थकीत कर भरणाऱ्यां साठी व्याजमाफी किंवा विशेष सवलत योजना लागु करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणीही निवेदनातुन करण्यात आली. नगरपंचायत प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या हिताचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी बलवंत पडोळे, राजु देशमुख, नगरसेवक निकेश मेश्राम, महेश झोडावणे, गणेश सरोदे, अभय जांबुतकर, धर्मराज मनगटे, इंद्रपाल सुखदेवे, पुंडलिक गिरे, मुकेश गिरे, गजानन जैसारे, सिद्धार्थ गजभिये आदी नागरिक उपस्थित होते.

Popular Articles