spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी घेतला सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा

– सर्व प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपिन यांनी आज, शुक्रवारी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक घेतली. शहरातील बांधकाम विभागाशी संबंधित सर्व प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मनपा मुख्यालयात आयोजित या बैठकीत मुख्य अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये यांच्यासह मुख्यालयातील व झोनचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सिमेंट रस्ते, बाळासाहेब ठाकरे प्राथमिक शिक्षण, कला व सांस्कृतिक केंद्र, मिनीमाता नगर येथील ३० खाटांच्या दवाखान्याचे बांधकाम, नंदनवन परिसरातील श्री लक्ष्मीनारायण व शिव मंदिर संकुल सुशोभीकरण आणि कुत्तेवाला बाबा मंदिर परिसराचे सुशोभीकरण या कामांची माहिती घेण्यात आली.

यासोबतच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मासळी बाजार उभारणे, भांडेवाडी येथे श्वान निवारा व चिकित्सा केंद्र तयार करणे, जिजाऊ स्मृती शोध संस्थानचे बांधकाम, मनपा मुख्यालयाचे मुख्य द्वार, संरक्षण भिंत व सौंदर्यीकरण, जयताळा येथे कार्यरत महिलांसाठी वसतीगृह बांधकाम आणि ‘हेल्दी स्ट्रीट प्रोग्राम’ अंतर्गत शंकर नगर व धरमपेठ भागात अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार रस्त्यांची सुधारणा करणे या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला.

याव्यतिरिक्त महाल येथील स्व. प्रभाकररावजी दटके रुग्णालय इमारत, श्रीमंत राजे रघुजीराव भोसले टाऊन हॉल, वाठोडा व भांडेवाडी येथील ‘नंदग्राम’ गोठे प्रकल्प, मोमिनपुरा येथील अत्याधुनिक ई-लायब्ररी, वाहतूक व पार्किंग व्यवस्था सुधारणा, साईनेज सिस्टीम, महाल येथील बुधवार बाजार व्यावसायिक संकुल, ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प, सक्करदरा भवन व्यावसायिक संकुल, गांधीबाग प्रकल्प, पारडी व्यावसायिक संकुल व भाजीपाला-मटण मार्केट आणि एकात्मिक निदान व डायलिसिस केंद्र या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.

प्रकल्पांची माहिती घेतल्यानंतर आयुक्त डॉ. विपिन यांनी सर्व प्रकल्पांना स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले. तसेच मनपाच्या सर्व झोन कार्यालयांचे आधुनिकीकरण करणे आणि सर्व प्रकल्पांच्या इमारतींवर ‘सोलर सिस्टम’ बसविण्याचे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले. पुढील बैठकीत प्रकल्पांमधील तांत्रिक अडचणींचा सविस्तर आढावा घेतला जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

Popular Articles