spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जगात हाहाकार! इराणकडून अमेरिकेला थेट मोठी धमकी

अमेरिका आणि इराण युद्धात अमेरिकेची कोंडी होताना दिसत आहे. चारही बाजूंनी अमेरिका घेरली आहे. अमेरिकेच्या मदतीला कोणतेही देश घावून येत नाहीत. यादम्यानच इराणकडून अमेरिकेला मोठा इशारा देण्यात आला.

28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर मोठा हल्ला झाला. या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. हा इराणसाठी मोठा झटका होता. मात्र, त्यानंतर ज्या पद्धतीने इराण उभा राहिला, त्याचा कोणी साधा विचारही केला नव्हता. इराणकडून घातक हल्ले इस्त्रायलवर आणि ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथे केले जात आहेत. इराणने पहिल्याच हल्ल्यात अमेरिकेने लावलेले रडार आखाती देशांमधील उडवले. आखाती देशही सध्याच्या घडीला अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेत आहेत. इराणकडून होर्मुज समुद्र मार्ग बंद करण्यात आल्याने अमेरिकेच्या गळ्याला मोठा फास लागला. अमेरिकेने या युद्धात अनेक देशांची मदत मागितली आहे. मात्र, जास्त करून देश या युद्धापासून दूर राहण्याच प्रयत्न करत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेला होर्मुज खाडी सुरू करायची आहे. कारण दररोज अब्जोपेक्षा जास्त नुकसान होत आहे. कारण नसतानाही जगातील अनेक देशांना या युद्धाचा फटका बसत आहे.

होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने तेलाची आयात आणि निर्यात थांबली आहे. इराणने स्पष्ट म्हटले की, जागतिक बाजारात तेलाच्या किमती अमेरिका आणि नाही तर इराण ठवतो. 200 पार बॅरलची किमती होणार असल्याचे इराणने सांगितल्याने जगाची झोप उडाली. तेलाच्या किमती कमी करण्यासाठी रशियाचे तेल खरेदी करण्याचे जगातील देशांना अमेरिकेने सांगितले. अगोदरच त्याच तेलावर अमेरिका निर्बंध घालत होती.

होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून काही देशांकडे साद घालण्यात आली. मात्र, जवळपास देशांनी हात वर केले, यामुळे तोंडावर पडण्याची वेळ डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आली. यादरम्यानच आत इराणकडून अमेरिकेला थेट मोठी धमकी देण्यात आली. इराणच्या या धमकीने मोठी खळबळ उडाली. अमेरिकेच्या प्लॅनिंगवर इराणकडून पाणी फेरण्यात आले.

इराणने अमेरिकेला थेट ओपन चॅलेंज करत म्हटले की, अमेरिकेने त्यांची युद्ध नाैका इराणच्या जवळच आणून दाखवावी फक्त… ही अत्यंत मोठी धमकी इराणची अमेरिकेला म्हणाली लागेल. कारण होर्मुज मार्ग सुरक्षित करण्याकरिता अमेरिकेने सात देशांना साद घातली. मात्र, कोणत्याही देशाने अजूनही अमेरिकेचा प्रतिसाद दिला नाही. यादरम्यान इराणकडून अमेरिकेला थेट धमकी देण्यात आली.

Popular Articles