spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तारसा रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात; मालगाडीच्या धडकेत दोन भावांचा मृत्यू

कामठी :- कामठी रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या तारसा रेल्वे स्थानकाजवळ एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास मालगाडीच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे दोन्ही मृत तरुण सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना १६ मार्च रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली. तारसा रेल्वे स्थानकाच्या पश्चिम यार्डातील ‘डाऊन लाईन’ क्रमांक-३ वर मालगाडीच्या चपेटात आल्याने दोन्ही तरुणांना आपला जीव गमवावा लागला.

१६ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता तारसा रेल्वे स्थानक, पश्चिम यार्ड, लाईन नंबर-३.

येथे घडलेल्या घटनेत शुभम इनवाते आणि वैभव इनवाते या दोन्ही भावांचा मृत्यू झाला. हे दोघेही भाऊ  निंबखेडा येथील रहिवासी होते.

घटनेची माहिती मिळताच कामठी रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील दृश्य अत्यंत भीषण होते; एका तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला, तर दुसऱ्याचा मृतदेह जवळच रुळाच्या कडेला पडलेला होता.

प्राथमिक तपासानुसार, हे दोन्ही तरुण रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक मालगाडी आली आणि त्यांचा अंदाज चुकल्याने ते गाडीखाली आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी येथील शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास कामठी रेल्वे पोलीस करत आहेत.

Popular Articles