किशोर साहू, मौदा :- मागील दोन वर्षांपूर्वीपासून अरोली – कन्हान या 109 करोड रुपयाचे रस्त्याचे सिमेंट करण्याचे काम हर्ष कन्स्ट्रक्शन कंपनी द्वारे सुरू असून हे काम आता शेवटच्या टप्प्यात आलेले आहे. या शेवटच्या टप्प्यात तालुक्यातील मोठे गाव असलेल्या निमखेडा येथे गावांतर्गत मुख्य रस्त्याचे सिमेंटकरणाला सुरुवात झालेली आहे. गाव मोठं असल्याने मुख्य रस्त्यावर डिव्हायडर टाकून सिमेंटकरण करण्यासाठी राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांना शिवसेना तालुका सचिव विनायक महादुले, माजी मौदा पंचायत समिती उपसभापती ज्ञानेश्वर चौरे, सामाजिक कार्यकर्ते पूर्णचंद्रराव वेमूरी, विनायक घाटबांधे, व्यंकटेश्वर मुम्मानेनी यांनी लेखी निवेदन दिलेले आहे.
निमखेडा येथील गावांतर्गत मुख्यरस्त्याच्या मधोमध डिव्हायडर टाकून सिमेंटकरण करण्यासाठी राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांना लेखी निवेदन









