spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उमरेड-कुही-भिवापूरच्या दुष्काळग्रस्त भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट शेतकऱ्यांशी संवाद

– पीक, पाणी आणि शेतकरी समस्यांचा घेतला आढावा; प्रशासनाकडे तातडीच्या मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन

उमरेड :- उमरेड-कुही-भिवापूर विधानसभा क्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नागपूर ग्रामीणच्या वतीने पाहणी दौरा उत्स्फूर्तपणे पार पडला. जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य राजाभाऊ टाकसाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या दौऱ्यात दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.

यावेळी संयुक्त सेवादलाचे राष्ट्रीय महासचिव जानाबाजी मस्के, उमरेड तालुकाध्यक्ष विलास झोडापे तसेच उमरेड विधानसभा अध्यक्ष पुंडलिक राऊत उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देत पिकांची परिस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांची पाहणी करण्यात आली.

दुष्काळामुळे पिकांवर होणारा परिणाम, पाण्याची टंचाई आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची गांभीर्याने दखल घेत शासकीय यंत्रणा आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन राजाभाऊ टाकसाळे यांनी दिले.

“दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. त्यांच्या हक्काच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील,” असा निर्धार राजाभाऊ टाकसाळे यांनी व्यक्त केला.

Popular Articles