– न्यायालयाचे नोटिसा; राजकीय वर्तुळात खळबळ.
कन्हान :- नगरपरिषद कन्हान-पिपरी निवडणुकी नंतर राजकीय वातावरण तापले असुन, संपुर्ण निवडणुक प्रक्रिया आता न्यायालयीन तपासणीच्या कक्षेत आली आहे.
निवडणुकीत पराभुत झालेले उमेदवार सतीश किशोर बेलसरे यांनी नागपुर जिल्हा न्यायालयात याचि का दाखल करत निवडणुकीच्या पारदर्शक तेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अधिवक्ता निहाल सिंह राठौड यांच्या माध्यमातुन दाखल झालेल्या या याचिके मुळे नगरपरिषद निवडणुकीच्या निकालावर अनिश्चित तेचे सावट निर्माण झाले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना बेलसरे यांनी सांगितले की, महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ नुसार निवडणुका मत पत्रिकेद्वारे घेणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ईव्हीएम चा वापर करण्यात आला. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार व्हीव्हीपॅट यंत्रणा अनिवार्य असतानाही कोणत्याही मतदान केंद्रावर ती उपलब्ध नव्हती. त्या मुळे संपुर्ण निवडणुक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागपुर जिल्हा न्यायालयाने राज्य निवडणुक आयोग, कन्हान-पिपरीचे निवडणुक अधिकारी तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र मधुकर शेंदरे यांच्यासह सर्व संबंधित पक्षांना नोटिसा बजावल्या आहेत. ई-कोर्टच्या माहितीनुसार, १९ जानेवारी रोजी न्यायालयाने याचिकेतील तांत्रिक मुद्दे ग्राह्य धरले असुन पुढील सुनावणी लवकरच होणार आहे. या घडामोडींमुळे कन्हान परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी पक्षातही या प्रक रणामुळे अस्वस्थता निर्माण झाली असुन भविष्यात काय निर्णय होईल याबाबत अनिश्चितता आहे. बेलसरे यांनी न्यायालयाकडे विद्यमान निवडणुक निकाल रद्द करण्याची मागणी केली असुन भविष्यात मतपत्रिका किंवा व्हीव्हीपॅटसह निवडणुका घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली आहे. विश्लेषकांच्या मते न्यायाल याने याचिकाकर्त्याच्या बाजुने निर्णय दिल्यास कन्हान नगरपरिषदे मधील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलु शक तात. त्यामुळे आता संपुर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणा च्या निकालाकडे लागले आहे.




