spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संजय राऊतांनी शंभर जन्म घेतले तरी ऑपरेशन कमळ शक्य नाही

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार 

मुंबई :- भाजपा हा राष्ट्रप्रथम या भावनेतून आणि राष्ट्रीय धोरण घेऊन चालणारा पक्ष आहे. तुमच्यासारखे स्वार्थाचे राजकारण भाजपा करत नाही. अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार असताना संजय राऊत आणि त्यांच्या पक्षप्रमुखांनी भाजपाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न अनेकदा केला. भाजपा आमदार, कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार – खासदार तर सोडाच साधा कार्यकर्ताही तुम्हाला भाजपापासून दूर करता आला नाही. कारण आम्ही सत्तेसाठी नव्हे तर देशासाठी काम करतो. म्हणूनच शंभर जन्म घेतले तरी ऑपरेशन कमळ शक्य नाही हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावे आणि मगच ऑपरेशन कमळच्या वल्गना कराव्यात, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बन म्हणाले की, इतरांना लांडगे, कोल्हे म्हणण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा संजय राऊतांनी आपण भांडूपच्या गाढव नाक्याचे नेतृत्व करतोय, हे ध्यानात ठेवावे. भांडूपच्या गाढव नाक्यावर उभे राहून तुम्ही सातत्याने जी बडबड करता त्यामुळे तुम्हाला गाढव नाक्याचेच नेतृत्व शोभते. तुमची गिधाडी प्रवृत्ती महाराष्ट्राने पाहिली आहे. कोविडच्या काळात महाराष्ट्राला लुटण्याचे पाप आणि गिधाडी वृत्तीने लोकांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार संजय राऊत, तुम्ही केला. त्यामुळे ऑपरेशन गिधाड तुम्हाला शोभते. तुम्ही गाढवांचेच नेतृत्व करू शकता, तेव्हढीच तुमची पात्रता आहे, अशा शब्दात बन यांनी राऊत यांचे वाभाडे काढले.

उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेत सत्तेत होते तेव्हा मनसेचे, आपल्या भावाचे सात नगरसेवक फोडायला संजय राऊत, आणि त्यांच्या पक्षाने मागेपुढे पाहिले नव्हते याची आठवण करून देत श्री. बन म्हणाले, तेव्हा नेमके कोण देहविक्री करत होते? तेव्हा राजकारणाचा गोलपीठा नेमका कोणी केला होता? बाजार कोणी मांडला होता? हे संजय राऊतांनी आणि सन्माननीय राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला सांगावे आणि मगच इतरांवर टीका करावी. राज ठाकरे म्हणाले की, भाजपा हा पत्त्याचा बंगला आहे. राज ठाकरे यांना इतकेच सांगणे आहे की भाजपा पत्यांचा बंगला नाही तर गेल्या 50 वर्षांपासून राष्ट्रीय विचारधारेवर मजबूतपणे उभा असलेला किल्ला आहे. पत्त्याचे बंगले कसे असतात, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे पाहिल्यावर कळते.

संजय राऊत, तुम्ही आणि तुमचा पक्ष आता काँग्रेसच्या राहुल गांधींच्या शेजेला जाऊन बसलाय. फक्त आणि फक्त खुर्चीसाठीच तुम्ही काँग्रेसच्या शय्येवर जाऊन बसलात. पेज आणि शेज तुम्हाला जास्त माहिती आहे. कारण त्याची सवय स्वतः संजय राऊतांना आहे. विचारधारा, हिंदुत्व, स्वधर्म सोडून तुम्ही राहुल गांधींच्या नादी लागलात. राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने तुम्हाला नेमके काय पेजेला दिले आणि तुम्ही त्यांच्या शेजेला का गेलात, याचे उत्तर द्या आणि मगच इतरांना पेज आणि शेजेबद्दल सांगा, असे बन यांनी फटकारले.

Popular Articles