spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एचपीव्ही लस घेतलेल्या दोन मुलींचा गौरव

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- तालुक्याच्या ग्रामपंचायत अजनी येथे एचपीव्ही लस घेतलेल्या दोन मुलींचा ग्रामपंचायत प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे या दोन मुलींमध्ये एक मुलगी ग्रामपंचायत सदस्यांची तर दुसरी आशा वर्कर यांची मुलगी आहे. याप्रसंगी सरपंच मनोज लिल्हारे, ग्रामपंचायत अधिकारी वर्षा बांडेबुचे, महिला आरोग्य सहाय्यीका शारदा जामनिक, सहाय्यक परिचारिका अश्विनी कोसरे, सुनील बन्सोड, अंगणवाडी सेविका रसिकाला फुटाणे, बेबी लील्हारे, आशा वर्कर उषा उपरडे, आरती नागपुरे तथा ग्रामपंचायत सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. सध्या प्रशाषणातर्फे एचपीव्ही लसीकरण मोहीम धडल्ल्याने राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत आजनीचे सरपंच मनोज लिल्हारे, ग्रामपंचायत अधिकारी वर्षा बांडेबुचे यांनी पुढाकार घेत सदस्य व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गावात सभा घेतल्या व या लसीकरणाबाबद जनजागृती केली. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र नगरधन अंतर्गत प्रथम लसीकरण करण्यात आले. गावातील १४ ते १५ वर्ष वयोगटातील दोन मुली तृप्ती रवींद्र नागपुरे व चांदनी विलास उपराडे यांनी पुढाकार घेत रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन लस घेतली.

Popular Articles