spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोर्शी तालुक्यातील घोडदेव खुर्द परिसरामध्ये अवकाळी पावसासह गारपीट ! 

– संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ! 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :-  मोर्शी तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी लागून असलेल्या मौजा घोडदेव खुर्द परिसरात दिनांक २० मार्च रोजी सकाळी ४ वाजता दरम्यान अचानक अवकाळी पावसासह झालेल्या जोरदार गारपीटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा बागांमधील आंबिया बहार संत्रा फळे झाडांवरून गळून पडली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आधीच मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्रा बागा विवीध रोगांमुळे सुकन्याच्या मार्गावर असतांना शेतकऱ्यांना उपाय योजना करण्यासाठी वन वन भटकावे लागत असून शेतकरी संत्रा बाग वाचविन्याच्या प्रयत्नात असतांना शेतकऱ्यांनी लाखो रुपये कर्ज काढून शेतकरी करो या मरो च्या परिस्थितीत असतांना आता पुन्हा झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे आंबिया बहाराच्या संत्राचे व संत्रा झाडांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे .

गारपीटीमुळे संत्र्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला असून बाजारभाव मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. आधीच वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या नुकसानीमुळे आर्थिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे उत्पादन धोक्यात आले आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच कृषी विभागाने त्वरित पाहणी करून अहवाल सादर करावा आणि शासनाने मदतीची घोषणा करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

अवकाळी पावसामुळे दरवर्षी नुकसान होत असून शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी

संत्रा उत्पादकांसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे

कृषी विमा योजनेंतर्गत त्वरित मदत मिळावी ही परिस्थिती पाहता शासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Popular Articles