– सोनार सेवा महासंघा तर्फे 15 मार्चला महिला दिवस मोठ्या उत्साहात
नागपूर :- सोनार सेवा महासंघ नागपूर तर्फे 15 मार्चला महाराष्ट्र वैश्य संघ हॉल मध्ये घेण्यात आला होता. महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पाहुणे म्हणून वृंदा विकास ठाकरे पुनम रविंद्र भुयार, अनुष्का कोहळे (वानखडे), अश्विनी जिचकार, नवनिर्वाचित नगरसेविका माला ढोमणे उद्योजिका वर्धा, इंद्रायणी काळबांडे, माजी सरपंच दिगडोह मनीषा ढोमणे उद्योजिका नागपूर, प्रभा बांगरे उद्योजिका सावनेर, सीमा बांगरे नवनिर्वाचित नगरसेविका सह उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन सोनार सेवा महासंघ नागपूरच्या अध्यक्षा अनिता दारव्हेकर यांनी केले. यामध्ये समाजामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा शॉल श्रीफळ व मोमेंटो देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. व त्यांना नारीशक्ती हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला बेयोंड्स डेस्टिनेशन चे संचालक आकाश काटोले व कल्याणी काटोले यांच्या तर्फे बक्षीसांचे वितरण करण्यात आले. लकी ड्रॉ काढण्यात आले व विजेत्यां मधील उपस्थित महिलांना लकी ड्रॉ द्वारे गृहपयोगी वस्तू देण्यात आल्या. तसेच सोनार समाजातील गरजू मुलींना माधवराव हिरुळकर व वैभव चिंचमलातपुरे यांच्या तर्फे शिलाई मशीन देण्यात आली. समाजातील एका गरीब मुलीला पुढील वाटचालीसाठी ही मशीन देण्यात आली. तसेच रजनी भालचंद्र बेदरकर व भालचंद्र नारायणराव बेदरकर या दांपत्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालिनी काटोले, प्रीती आसरे, वर्षा सज्जनवार, वंदना आसरे, शारदा हाडगे यांनी परिश्रम घेतले. सोनार सेवा महासंघाचे उपाध्यक्ष अशोक कऱ्हे यांनी संस्थेची माहिती संगितली. तसेच विद्या बालोली बोरकर यांनी स्वर सम्रानी तर्फे सुगम संगीताचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे संचालन सौ.अर्चना नेरकर यांनी केले. तसेच महाराष्ट्र सुवर्णकार व स्वर्णलंकार तर्फे शंभर महिलांना शुभेच्छा देवून बॅगा देण्यात आल्या.








