नागपूर :- शहरातील सुप्रसिद्ध ऑरेंज सिटी म्युझिक क्लब तर्फे आयोजित “म्युझिकल मोमेंट्स॒ ऑल टाइम हिट सॉंग्स” हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम शनिवारी 21 मार्चला सायंकाळी ५:३० वाजता. अर्पण सभागृह, मोरभवन, सीताबर्डी, नागपूर येथे आयोजित केला आहे. गायक आणि गायिकांमध्ये सुनीता बोरघाटे, अनिता मेंढे, भाग्यश्री कोटकर, शैलजा कापसे, स्वाती कामडे, स्मिता खोंडे, समीक्षा जैन, डॉ.भीमराव धारगावे, डॉ. विनोद बालकोटे, निलेश कोटकर, अनिरूद्ध जैन, सौरभ मेंढेकर यांचा सहभाग आहे. अत्यंत सुमधूर आणि सुश्राव्य गायन असा हा कार्यक्रम समस्त संगीतप्रेमींसाठी गाण्यांची मेजवानी राहणार आहे. या निःशुल्क कार्यक्रमास शहरातील संगीतप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक माधव लोखंडे यांनी केले आहे.
ऑरेंज सिटी म्युझिक क्लब तर्फे आयोजित “म्युझिकल मोमेंट्स॒ ऑल टाइम हिट सॉंग्स” हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम शनिवारी









