spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

NSS विशेष श्रम संस्कार निवासी शिबिराचे उत्साहात उद्घाटन

नागपूर :- राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत शासकीय आयटीआय नागपूर येथे आयोजित पाच दिवसीय विशेष श्रम संस्कार निवासी शिबिराचे उद्घाटन सोमवारी 23 मार्चला उत्साहपूर्ण मोठया थाटामाटात पार पडले. या कार्यक्रमाला प्रादेशिक कार्यालय नागपूरचे उपसंचालक किरण मोटघरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपसंचालिका श्वेता कुलकर्णी होत्या. तसेच किशोरी पंडिले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी एनएसएस कार्यक्रम अधिकारी शिवाजी ढुमणे, प्रभाकर खंडाते, सुधाकर गावंडे आदी उपस्थित होते. या निवासी शिबिरात एकूण 70 स्वयंसेवक सहभागी झाले होते. उद्घाटना प्रसंगी मार्गदर्शन करतांना मोटघरे यांनी विद्यार्थ्यांना समाजातील विविध समस्यांवर उपाय शोधण्याचे आवाहन केले. राष्ट्रसेवेची भावना रुजविण्यासाठी एनएसएसची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात श्वेता कुलकर्णी यांनी शिबिराचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. महात्मा गांधी यांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी समाजाभिमुख कार्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. तसेच किशोरी पंडिले यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी ढुमणे यांनी तर आभार प्रभाकर खंडाते यांनी मानले. संचालन साहेबराव गुडधे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एनएसएस टीमचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. शिबिरा दरम्यान श्रमदान, योगाभ्यास, बौद्धिक सत्रे व सांस्कृतिक कार्यक्रम यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर 23 ते 27 मार्च या दरम्यान चालणार आहे. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख सहदेव चव्हाण यांनी दिली.

Popular Articles