– धम्म रॅलीचे आयोजन, कन्हान मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम
कन्हान :- येथे केसीएस लामा चॅरिटेबल ट्रस्ट भारत, नागपुर यांच्या वतीने प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सिद्धार्थ कॉलनी बुद्ध विहारात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले.
गुरूवार (दि.२६) मार्च ला सायंकाळी 6 वाजता ‘कौन छौन सौनाम लामा चॅरिटेबल ट्रस्ट’चे संस्थापक अध्यक्ष भदंत आर्य के.सी.एस लामा महाथेरो यांच्या हस्ते बोधिसत्व चक्रवर्ती राजा सम्राट अशोक व महाकारुणिक तथागत बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पणा सह रॅलीला सुरूवात करण्यात आली. धम्म रॅली महामार्ग क्र.४४ चे भ्रमण करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान, सधंम्म बुद्ध विहार रेल्वे स्टेशन रोड येथे पोहचली. विहारात तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन तारसा चौक, गहु हिवरा रोड चौक, पांधण रोड, रॅलीचा सिद्धार्थ कॉलोनी गणेश नगर बुद्ध विहारात पोहचुन समारोप झाला.

सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांनी राजा सम्राट अशोक यांच्या जीवनीवर विशेष भाषणे केली. भगवान नितनवरे, प्रभुदास धनविजय यांनी राजा सम्राट अशोकाचा जीवनपट भाषणातुन प्रगट केला. संचालन राजेश फुलझेले यांनी तर आभार गौतम खंडारे यांनी मानले. बुद्धीस्ट वेलफेअर सोसायटी व समता सैनिक दल कन्हान, अखिल भारतीय भिक्खु महासंघ, सम्राट अशोक जयंती समारोह समिती कन्हान यांनी बुध्द वंदना घेवुन प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांच्या छायाचित्रांचे वाटप केले. स्नेह भोजनाने कार्य क्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी विनायक वाघधरे, पुंडलिक मानवटकर, दौलत ढोके, महेंद्र चव्हाण, राजेश फुलझले, संजय चंहादे, नितीन मेश्राम, रोहित मानवटकर, नगराध्यक्ष राजेंद्र शेंद्रे, नगरसेवक केतन भिवगडे, नगरसेविका सुचित्रा माटे, नगरसेविका पूनम राठी, मयुर माटे, पंकज रामटेके,अश्वमेघ पाटील, रजनीश बाळा मेश्राम, अभिजित चांदुरकर, संदिप शेंडे, चंद्रशेखर डोंगरे, गौतम खंडारे, प्रविण चांदुरकर, नितेश टेंभुर्णे, रत्नदीप गजभिये, बादल सहारे, जितु टेंभुर्णे, गुड्डू ठाकुर, आनंद चव्हाण, शैलेश दिवे,आदित्य टेंभुर्णे, निशांत मोटघरे, वंदना ढोके, अनिता डोंगरे, अस्मिता डोंगरे, सुनंदा बारमाटे, विजया निकोसे,कमल गटपाडे, बबीता मानवटकर, वनंंदा टेंभुर्णे, दुर्गा गजभि ये, अर्चना चव्हाण, अनिता दुपारे, मनुकला वाघमारे, वैजयंती पाटील, ज्योती मोटघरे, रुक्मिणी बनसोड, दुर्गा निकोसे, मालती कोल्हाटकर, जिजा मानवटकर, अर्चिता फुलझेले, सुनिता वासनिक, भावना टेंभुर्णॆ, आदी सह बौद्ध उपासक, उपासिका बहु संख्येने उपस्थित होते.
सम्राट अशोक हे या देशातील महान सम्राट होते- भदंत लामा महाथेरो
सम्राट अशोक राजाने मानवतेच्या कल्याणा साठी आपल्या राज्यात लोककल्याणकारी योजना राबविल्या. त्यांच्या राज्यात सुख, समृद्धी नांदत होती. त्यांनी लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली. विश्वाला दया, करुणा, शांती आणि मैत्रीचा संदेश दिला. सम्राट अशोक हे या देशातील महान सम्राट होते, बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मानवतेच्या कल्याणाचे कार्य पुढे नेले. असे प्रतिपादन भदंत आर्य के.सी.एस लामा महाथेरो यांनी केले.



