spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उष्मघाताने मजुर महिलेचा मृत्यु

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड मार्गावरील यशोधरा लॉन जवळ सुरू असलेल्या बांधकामात काम करणाऱ्या एका मजूर महिलेचा उष्मघाताने बळी पडल्याने शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल रात्री 8 वाजता घडली असून मृतक महिलेचे नाव दुलारी दिलीप वर्मा वय 34 वर्षे रा डिप्टी सिग्नल नागपूर असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक महिला ही पती सह यशोधरा लॉन जवळ सुरू असलेल्या बिल्डिंग बांधकामात पतीसह जुडाई चे काम करत होती दरम्यान सायंकाळी काम करून झाल्यानंतर मजूर महिलेची अचानक प्रकृती बिघसडल्याने उपचारार्थ कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविन्यात आले असता उपचार दरम्यान उपस्थित डॉक्टर ने मृत घोषित केले.

Popular Articles