spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अवघ्या २ तासात जबरी चोरीचा गुन्हा उघड

उमरेड :- यातील फिर्यादी धनराज नकटु गेडाम, वय ७६ वर्ष, रा. ओवाळा, पो. पळसगाव खुर्द, ता. नागभीड, जि. चंद्रपुर हे उमरेड बस स्थानक येथुन स्वतःचे गावी ओवाळा येथे जाणेकरीता बस ची वाट पाहत असतांना तेव्हा एक अज्ञात इसम त्याचे मोटार सायकल ने फिर्यादी जवळ आला व मी सुदधा ओवाळा येथे जात आहे तुम्ही माझेसोबत चला असे बोलुन फिर्यादी ला त्याचे मोसा वर बसवुन नेले. मौजा घुरखेडा ते मांगरूळ रोड सुनसान ठिकाणी अनोळखी ईसताने त्याची गाडी थांबवुन फिर्यादीला शिवगाळ करून फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली आणि फिर्यादीचे खिशातुन एकुण ३,०००/- रूपये जबरीने हिसकावुन मोटार सायकल घेवुन पळुन गेला. अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन उमरेड कलम १४०,३०९ (६) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद केला होता. पोलीस स्टेशन उमरेड अंतर्गत दिनांक ३०/०३/२०२६ रोजी

हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा, अनिल म्हस्के, अपर पोलीस पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण आणि वृष्टी जैन, सहा पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात उमरेड पोलीसांनी तात्काळ तपास सुरू करत सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे व त्याची गर्दीच्या ठिकाणी गुन्हा करण्याचे पध्दती नुसार आरोपीचा शोध घेणे कामी उमरेड बसस्थानक, भिसीनाका येथील बसथांबा, बायपास चौक येथील बसथांबा इत्यादी ठिकाणी पोलीस अमंलदार नेमण्यात आले. उमरेड पोलीसांना भिसीनाका बसथांबा येथे वयोवृध्द प्रवाशी थांबलेल्या ठिकाणी एक संशयीत इसम मोटर सायकलने फिरतांना दिसला पोलीसांनी त्याला ताब्यात घेवुन कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता त्याचे नाव आरोपी नामे प्रज्वल गजानन गोळे, वय २१ वर्षे, रा. मेंढा, ता भिवापुर, जि नागपुर असुन त्यानेच गुन्हा केल्याची माहीती पोलीसांना समजली.

अवघ्या २ तासात जबरी चोरीचा गुन्हा उघड करत पोलीसांनी नमुद आरोपीकडुन गुन्हयात चोरीस गेलाला संपुर्ण मुद्देमाल रोख रक्कम ३,०००/- रूपये आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटर सायकल किंमती २०,०००/- रूपये असा एकुण २३,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.