spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

क्रिकेट सट्टा / बेटिंग लावुन जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा नोंद  

काटोल :-  स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण यांचे पथक अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फतीने माहीती प्राप्त झाली की, टाटा इंडियन प्रीमियर लीग राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग आय पी एल क्रिकेट मॅच असल्याने काटोल हद्दीत आय यु डी पी कॉलनी, वार्ड नं. ७ येथील चौकामध्ये गौरव बुरंगे नावाचा इसम त्याच्या घरासमोर बसुन टाटा इंडियन प्रीमियर लीग २०२६ या सिरीजमधील राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग या संघा दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यावर मोबाईल द्वारे लोकांकडुन पैसे घेवुन हार जीतचा जुगार खेळत आहे. अशा विश्वसनिय माहीतीवरून पोलीस घटनास्थळी पोहचले असता काटोल येथील आय यु डी पी कॉलनी, वार्ड नं. ७ येथील चौकामध्ये एक ईसम मोबाईलचा वापर करताना दिसला. त्यास विचारपुस केली असता आरोपी क्र. १) गौरव विलासराव बुरंगे, वय ३५ वर्ष, रा. आय यु डी पी कॉलनी, वार्ड नं. ७ असे सांगितले. सदर आरोपीने अँड्रॉइड मोबाईल मध्ये आयडी बनवुन बेंटींग साईटवरून अवैधरित्या ऑनलाइन पद्धतीने विविध बेटिंग आयडी द्वारे स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी किकेट सट्टयावर ग्राहकाकडुन ऑनलाईन पैसे घेतल्याचे दिसुन आले. तसेच आरोपी क्र. १. याला विचारपुस केली असता तो आरोपी क्र. २) आरोपी विनय उर्फ विनू राजेश्वर वर्मा, वय ३७वर्षे, रा. खोजा लेआउट, काटोल याचे सांगणेवरून किक्रेट सट्टा चालवित असल्याची माहीती प्राप्त झाली. पोलीस पथकाने तात्काळ आरोपी क्र. २) याचा शोध घेवुन त्याला खोजा लेआउट, काटोल येथुन ताब्यात घेवुन त्याला अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, आरोपी क्रं ३) शिराज खान (शिराजभाई), रा. टेलिफोन एक्सचेंज चौक, नागपूर याचे सांगणेवरून ऑनलाईन किकेट सट्टा खेळत/खेळवित असल्याची माहीती प्राप्त झाली.

पोलीसांनी पंचासमक्ष अरोपीतांच्या ताब्यातुन १) २ वगेवगळ्या कंपनीचे अॅड्रॉरॉईड मोबाईल किंमती ६८,०००/- रुपये असा एकूण ६८,०००/- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद तिन्ही आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन काटोल येथे कलम १२ (अ) म जु का, ४९ भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.