spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जुगार अड्यावर धाड,सात जुगारी ताब्यात,3 लक्ष 27 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी :- वडोदा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या झुल्लर शिवारातील चेहडी रोड वर गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात वडोदा पोलिसांना यशप्राप्त झाले असून या धाडीतून 7 जुगाऱ्याना ताब्यात घेत त्यांच्याकडून 52 तास पत्ते,नगदी 7220 रुपये,एकूण 7 मोबाईल किमती 70 हजार रुपये, 5 दुचाकी किमती 2 लक्ष 50 हजार रुपये असा एकूण 3 लक्ष 27 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 7 जुगाऱ्यात रवींद्र प्रल्हाद मोटघरे वय 39 वर्षे रा झुल्लर,रमेश सुखदेव नागमोते वय 42 वर्षे रा झुल्लर,संभा उर्फ युवराज पंजाबराव वानखेडे वय 36 वर्षे रा झुल्लर,दिनेश कैलास राऊत वय 36 वर्षे रा इंडालको कंपनी, भीमराव नत्थुजी मेश्राम वय 38 वर्षे रा इंडाल्को कंपनी,सतीश ज्ञानेश्वर वानखेडे वय 35 वर्षे रा झुल्लर,नितेश रामकृष्ण गजभिये वय 36 वर्षे रा सुकडी असे आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.