सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- विद्यासागर कला महाविद्यालय खैरी ( बिजेवाडा ) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कविवर्य सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी भीम गीत तसेच देशभक्तीपर गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सातत्याने १ तास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा वाचून श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश सोमकुवर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी डॉ. रवींद्र पानतावणे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गिरीश सपाटे यांनी आणि डॉ. सावन धर्मपुरीवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कविवर्य सुरेश भट यांच्या कार्य कर्तुत्वाचा थोडक्यात आढावा घेतला. याप्रसंगी डॉ. विलास जायभाये आणि प्रा. रणजीत वायसे यांनी भीमगीत सादर केलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. ज्योती कवठे, डॉ. सतीश महल्ले, डॉ. आशिष ठाणेकर, गंगा मोंढे तसेच सर्व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.
“ग्रंथ वाचन करून विद्यार्थ्यांनी दिली श्रद्धांजली”
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.