Home Latest News डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची दौड जागतिक स्थरावर पोहोचली – यशवंत तेलंग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची दौड जागतिक स्थरावर पोहोचली – यशवंत तेलंग

0
32

नागपूर :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॅरेथॉन दौड समितीच्या वतीने महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ मॅरेथॉन दौड चे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ वी जयंतीनिमित्ताने १४ एप्रिल रोजी, सकाळी ७ वाजता संविधान चौकातून तर दीक्षाभूमीपर्यंत मॅरेथॉन दौड ची साडे आठ वाजता सांगता झाली. अध्यक्ष यशवंतराव तेलंग सचिव योगेश ठाकरे, डॉ.शरद सुर्यवंशी, गुरुदेव नगरारे, तसेच मान्यवर राजा ताकसांडे यांनी स्पर्धेच्या पूर्वी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून या मॅरेथॉन दौडला सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांना रोख परितोष बक्षीस देण्यात आले व सर्वांना प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

मॅराथॉन स्पर्धा कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर यशवंत तेलंग यांनी विद्यार्थी धावपटू यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि विचारांची दौड, विचारांचा वारसा, आत्मसात केल्याने नवे विचार, प्रगती, नवे चैतन्य, कौशल्य, हे संविधानाच्या प्रेरणेतून निर्माण होते. डॉ.आंबेडकर यांच्या विचारांची दौड जागतिक स्तरावर पोहचली असे त्यांनी यावेळी सांगितले. मॅराथॉन दौड़ या स्पर्धेला पंचशील ध्वज दाखविण्यासाठी व स्पर्धेप्रसंगी राष्ट्रीय धावपटू अंजली मडावी, कृष्णदत्त चौबे, डॉ. प्रज्ञय ताकसांडे, अनुपमा तेलंग, प्रीती दहीकर, अशोक चौधरी, गौतम जनबंधू, सतीश खोब्रागडे, मनीष लांजेवार, संम्येक तेलंग, प्रा.विजय बारसे, रीना जनबंधू आदी मान्यवर उपस्थित होते.