spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अक्षयतृतीया दिवशी बाल विववाह प्रतिबंध

हंसराज, भंडारा :- समाजामध्ये मोठया प्रमाणावर असलेल्या अशिक्षीतपणा, मागासलेपणा, गरीबी, लहान वयात लग्न करण्याची रुढी, परंपरा जाती व्यवस्था यामुळे बाल विवाहाचे प्रमाण वाढत आहेत. भारतीय संस्कुतीत विवाह ही समाजातील महत्वाचे आणि सार्वत्रिक सामाजिक क्रिया आहे. सहाजिकच शुभ मुहुर्तावर सामुदायीक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बाल विवाहाचे प्रमाण मोठया प्रमाणात असण्याची शक्यता नाकारत येत नाही.या वर्षी अक्षयतृतीया हा दिवस 19/04/2026 रोजी असुन त्यावेळी बाल विवाह सुद्धा मोठया प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

03 जुन 2013च्या अधिसुचनेनुसार तसेच बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 (2007च्या 6) कलम16 ची पोट कलमे (1) व (3) नुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) आणि प्रकल्पा अंतर्गत नेमलेल्या अंगणवाडी मुख्यसेविका, व ग्रामपंचायत स्तरावर संबधीत ग्रामपंचायातचे ग्रामसेवक यांना बाल विवाह प्रतिबंध अधिकारी म्हणुन घोषीत करण्यात आलेले आहेत.त्यामुळे बाल विवाह रोखणे आणि बाल हक्काचे संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न होणे आवश्यक आहे. अक्षयतृतीयाच्या शुभ मुहुर्तावर किंवा इतर वेळेस होत असलेले विवाह समारंभांत बाल विवाह होणार नाही.याकरीता प्रत्येक सुजाण नागरीकांना यांची खबरदारी घेतली पाहिजे.18 वर्षाच्या आत मुलीचे लग्न व 21 वर्षाच्या आत मुलाचे लग्न लावणे कायदयाने गुन्हा आहे.बाल विवाह करणे कायद्याने गुन्हा असुन बालकांशी विवाह करणाऱ्याला व करुन देणाऱ्याला दोन वर्षाची सक्तमजुरीची कैद व 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकते असे बाल विवाह आपल्या गावात होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन 1098 या क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरुण धों.बांदुरकर यांनी केले आहे.

Popular Articles