spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पैशांच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; उसनवारी पैसे मागणे पडले महागात. आरोपीला अटक

कामठी :- जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिली हवेली चौक परिसरात पैशांच्या देवाणघेवाणीवरून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना १५ एप्रिलच्या रात्री ११ ते ११:३० च्या सुमारास अस्लम भाई यांच्या हॉटेलजवळ घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे.

फिर्यादी मुमताज अहमद (२५, रा. कोळसाटाळ) आणि त्याचा मित्र मोईनुद्दीन सलाउद्दीन शेख (२६) हे पिली हवेली चौकात उभे होते. यावेळी तिथे आरोपी शफिक महम्मद रफिक अंसारी (२६, रा. इस्माईलपुरा) आला. मोईनुद्दीनने आरोपीकडे आपले उसने दिलेले पैसे परत मागितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात आरोपी शफिकने शिवीगाळ करत आपल्या गाडीच्या डिक्कीतून चाकू काढला आणि मोईनुद्दीनच्या छातीखाली वार करून त्याला गंभीर जखमी केले.

घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसांनी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला सुमारे २८ सेमी लांबीचा चाकू जप्त केला आहे. पीएसआय सागर भंडारी यांनी तक्रार नोंदवून घेत आरोपी शफिकला १६ एप्रिल रोजी सकाळी अटक केली. आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (जीवे मारण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय मेश्राम करीत।आहेत.

Popular Articles