कामठी :- केंद्रीय शिक्षण महामंडळातर्फे फेब्रुवारी मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल 15 एप्रिल ला जाहीर करण्यात आला.
दरम्यान कामठी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी भरभरून यश संपादन केले.कामठी येथील न्यू खलाशी लाईन रहिवासी व स्वामी अवधेशानंद शाळेत शिक्षण घेत असलेल्या पूर्वा विलास खोब्रागडे,तनिष्का कैलास खोब्रागडे, शालीन निकेश लांजेवार, आर्या मुकेश मेश्राम या चारही विद्यार्थिनींनी सुयश मिळविले.या चारही विद्यार्थिनींनी यशस्वी गुण प्राप्त करून यशाचे स्थान प्राप्त केले.या चारही विद्यार्थिनींनी यशाचे श्रेय शिक्षक व पालकांना दिले.
या यशाबद्दल या चारही विद्यार्थिनींचे कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम,सुभाष सोमकुवर, दिपंकर गणवीर,नागसेन सुखदेवें,ललिता अरविंद मेश्राम, अनिता निकोसे,मंदा खोब्रागडे,नयन सोमकुवर, पलास मेश्राम आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदनाचा वर्षाव केला.








