spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नगर परिषद खापा येथे बसवेश्वर महाराज जयंती साजरी

खापा, वार्ताहर :- नगर परिषद कार्यालय, खापा येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९५ वी जयंती रविवार १९ एप्रिल रोजी साजरी करण्यात आली. या प्रसंगी खापा शहरातील विरशैव लिंगायत समाज बांधव तसेच न. प. कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. या पावन पर्वावर महात्मा बसवेश्वर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून पुजा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.

याप्रसंगी न.प. प्रशासकीय अधिकारी वैभव गोळे, कर अधिकारी ज्ञानेश्वर सोनवाने तसेच न.प खापा नगराध्यक्ष पियुष बुरडे, नगरसेवक निखिल आष्टनकर, चंद्रकात लिखार, आनंद मेनकुदळे, तसेच लिंगायत समाज मठचे अध्यक्ष कैलास कापसे, विलास आवते, योगेश दिवे, अनिल मेनकुदळे, राजेश आवते, राजेन्द्र कापसे, दिनेश कापसे, नितीन आवते, अतुल आवते, किशोर आवते, पंकज नांदेकर, रत्नाकर नांदेकर, बबन नांदेकर, मिलिंद कापसे, कावळे जवाई आदी समाजबांधवांसह निलेश रेवतकर, मोनेश रेवतकर, राहुल बावणकुळे, राजु बिजेकर, कपील निनावे, विजय ठेंगडी आदी नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संचालन शेखर आवते यांनी केले. तर आभार व कार्यक्रमाचे नियोजन जितेन्द्र कापसे यांनी केले. खापा नगरपरिषद येथे कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व लिंगायत समाज बांधवानी न. प. प्रशासनाचे आभार मानले.

Popular Articles