Home Latest News अज्ञात वाहनाच्या धडकेत २३ वर्षीय तरुणीचा मृत्यु , दोघी जख्मी

अज्ञात वाहनाच्या धडकेत २३ वर्षीय तरुणीचा मृत्यु , दोघी जख्मी

0
212

– हळदीला जाताना अपघातात रश्मी बागडे चा घटनास्थळीच मुत्यु

कन्हान :- नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील एमएचकेएस पेट्रोल पंपच्या थोडे पुढे १०० मिटर वाघोली शिवारात स्कुटी दुचाकीला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक मारल्याने तरूणी रश्मी बागडे रोडवर खाली पडुन वाहनाने तिचे डोके फुटुन रक्तस्त्राव झाल्याने तिचा घटनास्थळीच मुत्यु झाला तर दोघी तरूणी स्कुटीसह घासत गेल्याने जख्मी झाल्याने त्यांचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटने मुळे कन्हान परिसरात हळहळ व्यकत होत आहे.

रविवार (दि.१९) एप्रिल ला रात्री ८.३० वाजता कन्हान येथुन मृतक कु. रश्मी विनोद बागडे वय २३ वर्षे रा. स्टेट बँक मागे हनुमान नगर कन्हान, तेजस्विनी प्रमोद बावनकुळे वय २४ वर्षे रा. इंदिरा नगर कन्हान, आणि श्रद्धा दिलीप बंड वय २४ वर्षे रा. सुपर टाऊन कन्हान या तिघी स्कुटी क्र. एम एच ४० सी एल ७६८९ दुचाकीने वाघोली गावातील त्यांच्या मैत्रीणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असताना रात्री ९ वाजता दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय महा मार्ग क्र. ४४ वरील एमएचकेएस पेट्रोल पंप च्या थोडे पुढे १०० मिटर लांब वाघोली शिवारात स्कुटी दुचाकी ला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार झडक मारल्याने मागे श्वार तरूणी रोडवर खाली पडुन वाहनाच्या माराने तिचे डोके फुटुन रक्तस्त्राव झाल्याने तिचा घटनास्थ ळीच मुत्यु झाला तर दोघी तरूणी स्कुटीसह सामोर घासत गेल्याने जख्मी झाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असुन तेजस्विनी गंभीर जख्मी असल्याने आयसीओ मध्ये उपचार सुरू आहे.

अपघाताची माहिती मिळताच कन्हान पोलीस घटनास्थळी पोहचुन पंचनामा करित पोलिस मित्र तथा समाजसेवक अनिल आंबिलढुके यांना बोलावुन त्याचे टाटा एस क्र. एमएच ४० सी एम ७४२७ या चारचाकी वाहनात तरूणीचा मुतदेह उचलुन ठेऊन कामठी उप जिल्हा रूग्णालयात उत्तरिय तपासणी करिता नेण्यात आला. कन्हान पोलीसानी फिर्यादी श्रध्दा बंड या जख्मी तरुणीचा तक्रारीवरून अज्ञात वाहन चालका विरुद्ध अप.क्र. २८६/२०२६ व कलम १०६ (१), २८१ बीएनएस सह कलम १८४ मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे .