– इवा वर्ल्ड टूर्स, नागपूर तर्फे 19 ते 23 एप्रिल दरम्यान दुबई ग्रुप टूर ही महाराष्ट्रातील प्रवाशांना धैर्य, आत्मविश्वास ठरली
नागपूर :- जगभरातून अनेक देशातून दुबई येथे हजारो प्रवासी येतात परंतु युद्धाच्या दशहतीमुळे जगभरातून प्रवासी येणे थांबले परंतु एकमेव महाराष्ट्रातील नागपूर येथील प्रवाशांनी युद्धजन्य परिस्थितीत दुबई चां टूर करून धाडसी निर्णय घेऊन स्पेशल केला व टूर यशस्वी केला पर्यटन हे नुसता एन्जॉय करण्यासाठी नसून ते देशा देशात बंधुभाव वाढविणे व तो टिकवून ठेवणे तसेच मानवतावादी दृष्टीकोन दृढ करणे व सांस्कृतिक सामाजिक आर्थिक राजकीय विचाराच्या आदान प्रदानातून देशा अंतर्गत विकास घडवून आणण्याचे एक सशक्त माध्यम आहे दुसऱ्या देशातील समस्त विकासात्मक बाबीचे अवलोकन करून माझ्या देशात ही तसा विकास व्हावा त्यासाठी समाजात जाणभाण निर्माण करून सशक्त समाजाची त्या विचारून निर्मिती करणे हा सुद्धा आहे दुबई मधील प्रगती थक्क करणारी व प्रत्येक बाब नियोजन बद्ध आहे ते तेथील राजकीय शक्तीचा प्रामाणिक स्वच्छ व लोकाभीमुख विकासाचा दिशेने केलेल्या प्रयत्नांचा आरसा आहे रस्ते हे सिमेंट चे नसून डांबराचे व नियोजन बद्ध आहे तसा भ्रष्टाचार मुक्त प्रामाणिक विकास हा माझ्याही देशात व्हावा हे प्रत्येक पर्यटकाला वाटणे साहजिक आहे. जाहिराती अजिबात नाही प्रधानमंत्र्याचे फोटो फक्त मुख्य रस्त्यावर आहे पण त्यावर त्यांचे नाव लिहिले नाही गाइड सांगतो तेव्हाच नाव माहित होत हे विशेष आपल्याकडे विकासा पेक्षा जाहिराती वर भर असतो हे जाणवल्याशिवाय राहत नाही दुबई हे खरे मानवनिर्मित मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेले जगासाठी लोकाभिमुख आदर्श मॉडेल आहे व मानवतेचा दृष्टिकोन ठेऊन काम करणे हे त्यांचे ब्रिद अनेक ठिकाणी त्यांनी पर्यटनस्थळां कडे जाणाऱ्या मार्गावर लिहिले आहे हे खूप महत्वाचे संदेश देणारे आहे ते प्रत्येकाच्या मनात आदर व प्रेम निर्माण करणारे आहे प्रत्येकाने एकदा नक्की दुबई बघावी व मानवतेचा दृष्टिकोन च जगाला थक्क करणारी प्रगती करू शकतो हे सर्वांना कळेल असे वाटते.
इवा वर्ल्ड टूर्स, नागपूर तर्फे 19 ते 23 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेली दुबई ग्रुप टूर ही धैर्य, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट नियोजन यांचा आदर्श नमुना ठरली.
जागतिक परिस्थिती पूर्णपणे स्थिर नसतानाही या ग्रुप ने घेतलेला प्रवासाचा निर्णय यशस्वीपणे पूर्ण करून एक वेगळी प्रेरणादायी कहाणी निर्माण केली आहे. या टूरमध्ये एकूण 22 प्रवाशांचा सहभाग होता. परिस्थितीचा सखोल अभ्यास, योग्य माहिती आणि सुरक्षिततेची खात्री करून हा प्रवास आखण्यात आला. घरच्यांची चिंता असतानाही प्रवाशांनी दाखवलेली हिंमत आणि सकारात्मक दृष्टीकोन विशेष ठरला.
दुबईमध्ये आगमनानंतर या गटाचे विविध ठिकाणी उत्साहाने स्वागत करण्यात आले. हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन स्थळे तसेच विविध सेवांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी या गटाच्या धैर्याचे कौतुक केले. “अशा परिस्थितीत प्रवास करणे म्हणजे खऱ्या अर्थाने धाडस आहे,” अशा प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त करण्यात आल्या.
दुबईतील ‘पेशवा’ रेस्टॉरंटमध्ये गटाचे विशेष स्वागत करण्यात आले. संचालक सचिन जोशी यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्व प्रवाशांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. त्यांनी सांगितले की, “तुमच्यासारख्या धैर्यवान प्रवाशांमुळे व्यवसायाला उभारी मिळते आणि इतरांनाही प्रेरणा मिळते.” हा क्षण प्रवाशांसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला. या संपूर्ण टूरदरम्यान हॉटेल, जेवण, वाहतूक आणि पर्यटन स्थळांची व्यवस्था अत्यंत सुरळीत आणि उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आली होती. प्रवाशांना प्रीमियम दर्जाच्या सेवांचा अनुभव मिळाला. दुबईतील प्रसन्न वातावरण आणि स्थानिकांकडून मिळालेली सकारात्मक प्रतिक्रिया यामुळे हा प्रवास अधिकच संस्मरणीय ठरला.
टूरनंतर सर्व प्रवाशांनी समाधान व्यक्त करत, पुन्हा एकदा युवा वर्ल्ड टूर्ससोबत प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली. धैर्य, नियोजन आणि एकजूट यांच्या बळावर ही दुबई सफर यशस्वी ठरली असून, इतरांसाठीही प्रेरणादायी ठरली आहे. या टूरमध्ये एकूण २२ प्रवाशांचा सहभाग होता. या गटाचे नेतृत्व आयोजक श्रीरंग मदनकर (इव्हा वर्ल्ड टूर्स) यांनी केले. त्यांच्या सोबत नरेश शाहरे, सुषमा भड, स्नेहल मानेकर, रत्ना नरड अंजली मानेकर, अनिल येरावर, वंदना येरावर, शशांक पुजारी, रमा पुजारी, प्रियंवदा दुलीपवार, सुधीर गिराडे, कुंदा गिराडे, रविंद्र कामडे, उषा कामडे, वसुंधा येलणे, वनीता ठाकरे, वैभव साल्वे, प्रांजली साल्वे, रत्नमाला नरड, कल्पना आमधरे, भावना बेन पटेल आणि श्रद्धा चौधरी यांचा समावेश होता.

