Monday, April 27, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आजाराने त्रासलेल्या इसमाने घेतला गळफास

खापा, वार्ताहर :- खापा शहरातील किल्लापुरा येथील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार (ता. 25 एप्रिल) ला सकाळी सहा वाजता दरम्यान उघडकीस आली. रूपचंद धर्मराज डेकाटे (वय ५५ वर्ष) असे मृतक इसमाचे नाव आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपचंद हा व्यसनाधीन होता. त्याला दारूचे व्यसन जडलेले होते. दारूच्या अति सेवनाने पिलीया या आजाराने तो ग्रासलेला होता. त्याचे पोट खूप फुगलेले होते. या आजाराने त्रस्त होऊन रूपचंद यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी परिसरात चर्चा आहे. घरातील छपरीतील एंगलला नायलॉन दोरी बांधून गळफास लावून आपली जिवन यात्रा संपवली.

रूपचंद याची मुलं नोकरीनिमित्त पुण्याला वास्तव्यास असल्याने पत्नी ही मुलांसोबत पुण्याला राहायची. त्यामुळे रूपचंद घरी एकटाच राहायचा. सकाळी जेव्हा परिसरातील लोक उठले, त्यावेळेस रूपचंद हा गळफास घेतलेल्या अवस्थेत परिसरातील नागरिकांना दिसून आला. त्वरित खापा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आले. शवविच्छेदनासाठी सावनेर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदन करून मृतदेह परिवारातील सदस्यांना ताब्यात देण्यात आले.

प्राथमिक तपास ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात ए. एस. आई. विनोद पाटील व पोलिस शिपाई मनीराम नेवारे यांनी केला. पुढील तपास खापा पोलीस करीत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.