– शेतकऱ्यांची कामे खोळंबण्याचे प्रमाण वाढतीवर
सचिन चौरसिया, रामटेक:- तालुक्यात आदिवासीबहुल भाग मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने जिल्हा परिषदेतील कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठीच्या अनेक महत्त्वाच्या योजना या भागात मोठ्या प्रमाणात राबविल्या जातात. मात्र रामटेक पंचायत समितीमधील कृषी कार्यालयात कार्यरत महीला कृषी अधिकारी येथे कायमस्वरुपी नसल्याने त्यांना येथे नेहमी उपस्थित राहाणे शक्य नसते व त्यांच्या अनुपस्थितीत शेतकऱ्यांना येऊन काम न होताच आल्यापावली परत जावे लागते. तेव्हा येथे कायमस्वरूपी पुर्णवेळ कृषी अधिकारी द्या अशी मागणी शेतकरी संदीप इनवाते यांचेसह इतर शेतकऱ्यांनी केली आहे. रामटेक पंचायत समिती येथे प्रभारी कृषी अधिकारी म्हणून एक महिला अधिकारी कार्यरत असून त्या अपंग आहेत. भरीस भर त्यांचेकडे दोन ठिकाणचा कार्यभार आहे. त्या रामटेक ला प्रभारी म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे त्या सहसा रामटेक कार्यालयात उपस्थित राहात नसल्याची शेतकऱ्यांत ओरड आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबतात. विद्यमान मंत्रीमहोदय राहात असलेल्या शहरातच अशी परिस्थिती निर्माण होणे ही येथे एक शोकांतीकाच म्हणावी लागेल. तेव्हा रामटेक पंचायत समिती येथे पूर्णवेळ कायमस्वरूपी कृषी अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप इनावते यांचेसह शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबद रामटेक पंचायत समितीचे बिडीओ जयसिंग जाधव यांना विचारणा केली असता ‘ त्या महिला कृषी अधिकाऱ्याकडे दोन ठिकाणचा कार्यभार जरी असला तरीही त्या रामटेक कार्यालयात कामे भरपुर असल्यामुळे ज्यास्तीत ज्यास्त वेळ येथेच राहात असतात ‘ असे जाधव यांनी सांगीतले.
रामटेक पं. स. मध्ये कामे विस्कटली
संपुर्ण जिल्ह्यात रामटेक तालुक्यात टीएसपी चा कोटा असून अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी व नवीन बोअर मंजूर असून त्या शुल्लक शुल्क कारणावरून रद्द केत्या जात असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. त्याचप्रमाणे या वर्षात मोठ्या प्रमाणात ओटीएसपी, टीएसपी, व एससीपी या योजनेतून अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर आहेत परंतु पंचायत समिती रामटेक येथील कृषी अधिकारी हे पद प्रभारी असल्यामुळे सदर योजनेची पाहिजे तेवढी अंमलबजावणी होत नाही अशी ओरड शेतकऱ्यांची आहे करिता सदर ठिकाणी पूर्णवेळ कृषी अधिकारी देण्याची मागणी आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

