spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गोदाम फोडून ५२ हजारांच्या माल लंपास

◼️सोनेघाट शिवारातील घटना 

◼️खरीप हंगामासाठी ठेवले होते बियाणे 

सचिन चौरसिया,रामटेक :- तालुक्यातील कवडक (दुधाळा) येथील शेतकऱ्याच्या शेतातील गोदाम फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ५२,९०० रुपयांचा माल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेतकरी गुलाब किशोर हारोडे (वय ४२) रा. कवडक सोनेघाट ते सोनेघाट शिवारात विवेक निकोसे यांची शेती मागील दहा वर्षांपासून ठेक्या-बटईने करत आहेत. शेतातील गोदामात मागील हंगामातील त्यांनी १७ पोती धान्य (बियाणे ) ठेवण्यात आले होते. सोमवार (दि.२०) एप्रिल रोजी सायंकाळी गोदाम सुरक्षित होते. बुधवार (दि.२२) एप्रिल रोजी सकाळी शेतातील कामगार दुलीचंद नारनवरे हा शेतात गेला असता गोदामचे दोन्ही कुलूप तुटलेले दिसले. त्याने ही माहिती हारोडे यांना दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गोदाम मधील १७ पोती धान्य, एक लोखंडी पलंग, साडेसात, पाच व तीन हॉर्सपावरच्या पाण्याच्या मोटारी, प्लास्टिक व जर्मन घमेले असा एकूण ५२,९०० रुपयांचा माल चोरीस गेल्याचे आढळून आले. या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Popular Articles