Wednesday, April 29, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“अतिक्रमणांना कायदेशीर मान्यता देऊन प्रत्येक कुटुंबाला घराचा हक्क मिळवून देणार” – लायकराम भेंडारकर

यासीन शेख, गोंदिया :- पंचायत समिती सभागृह, अर्जुनी मोरगाव येथे “सर्वांसाठी घरे 2022” या महत्त्वाकांक्षी शासकीय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना भेंडारकर यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीमार्फत प्राप्त झालेल्या शासकीय जागांवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांच्या अतिक्रमणांचे नियमानुसार रूपांतर करून त्यांना अधिकृत घरकुल लाभार्थी म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान अतिक्रमणांची सद्यस्थिती, त्यांचे सर्वेक्षण, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि पात्र लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे व निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केले.

या बैठकीला तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, पंचायत समिती उपसभापती संदीप कापगते, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गणवीर व श्रीकांत घाटबांधे, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, डॉ. नाजुक कुंभरे, नूतन सोनवाणे, कुंदा लोगडे, पुष्पलता दृगकर, शालिनी डोंगरवार, भाग्यश्री सयाम, नायब तहसीलदार मंगेश क्षीरसागर तसेच ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि संबंधित शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.