Thursday, April 30, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जि.प.आदर्श घोटमुंढरी शाळेची गुणवत्तेच्या बाबतीत पुन्हा भरारी

किशोर साहू, मौदा :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS)या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये पंचायत समिती मौदा तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा घोटमुंढरी येथील  इशिका श्रावणकर आयुती घरडे या दोन्ही विद्यार्थीनींनी घवघवीत यश संपादन केले. या शिष्यवृत्ती साठी दोघींचीही निवड झालेली असून शाळेच्या शिक्षकांच्या व व्यवस्थापन समिती ,माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले.

या यशामुळे या विद्यार्थ्यांना दरमहा 1000 रूपये असे चार वर्ष एकूण 48000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.यांच्या यशाचे सगळीकडे कौतुक होत आहे.

आम्ही गुणवत्ता आणि विविध स्पर्धा परीक्षांना विद्यार्थी कसे यश प्राप्त करतील आणि शाळेची गुणवत्ता अधिक उंचीवर नेण्यासाठी , विद्यार्थ्यांचा बौद्धिक व सर्वांगिक विकास करण्यासाठी मी आणि माझे शिक्षकवृंद आम्ही सदैव तत्पर राहू आणि आजच्या तंत्रज्ञान युगातील बऱ्याच सुविधा आमच्या शाळेत उपलब्ध आहेत,काहींवर कार्य सुरू आहे,असे मत मुख्याध्यापक विकास धारगावे यांनी व्यक्त केले.

सत्कार व कौतुक करणाऱ्यांमध्ये गट ग्रामपंचायत घोटमुंढरीच्या सरपंचा चंदा गेडाम ,तंटामुक्ती अध्यक्ष गोरक्षनाथ मडावी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष उदय पांडे, उपाध्यक्ष मंगेश आंबेडकर, सदस्य अर्जुन घरडे, डॉ. मिलिंद रंगारी ,शंकर पटले ,प्रवीण राऊत ,अमोल उईके ,प्रशांत वाढवे, प्रतीक पटले ,चेतन पटले, नीता घरडे, मौसमी घरडे, अपर्णा घरडे, सुरेखा श्रावणकर, आरती श्रावणकर ,शीतल बागडे, प्रियंका श्रावणकर, मोनाली पटले, सोनू कुलसाम, सुलोचना ढोरे ,शिक्षकवृंद खुरसुंगे ,थुलकर, आम्रपाली घरडे, कीर्ती पटले सह समस्त शिक्षकेतर कर्मचारी वृंदाच्या समावेश आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.