Home Latest News वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

0
47

पांढरकवडा :- गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेची तीव्रता जाणवू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तापमानात सध्या दुपारच्या वेळेत उन्हाचा तड़ाखा अधिक वाढत असल्याने उष्माघात, डोकेदुखी, चक्करयेणे, अंगात अशक्तपणा यांसारख्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतात काम करणारे मजूर यांना याचा अधिक धोका असल्याचे स्पष्ट केले, नागरिकांनी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे, डोक्यावर टोपी किंवा अंगरखा वापरावा, तसेच भरपूर पाणी, लिंबूपाणी, ताक, सरबत यांसारखे द्रवपदार्थ घ्यावेत, बाहेर पड़तांना हलक्या रंगाचे सैल कपड़े परिधान करावेत आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नये दरम्यान, कोणाला उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तत्काळ सावलीत विश्रांती घ्यावी आणि आवश्यक असल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून स्वतची व कुटुंबियांची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने अधोरेखित केले.