Home Latest News वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

0

<p><strong>पांढरकवडा &colon;-<&sol;strong> गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेची तीव्रता जाणवू लागली आहे&period; या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी à¤…से आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे&period; तापमानात सध्या दुपारच्या वेळेत उन्हाचा तड़ाखा अधिक वाढत असल्याने उष्माघात&comma; डोकेदुखी&comma; चक्करयेणे&comma; अंगात अशक्तपणा यांसारख्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे&period; विशेषतः लहान मुले&comma; ज्येष्ठ नागरिक आणि शेतात काम करणारे मजूर यांना याचा अधिक धोका असल्याचे स्पष्ट केले&comma; नागरिकांनी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे&comma; डोक्यावर टोपी किंवा अंगरखा वापरावा&comma; तसेच भरपूर पाणी&comma; लिंबूपाणी&comma; ताक&comma; सरबत यांसारखे द्रवपदार्थ घ्यावेत&comma; बाहेर पड़तांना हलक्या रंगाचे सैल कपड़े परिधान करावेत आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नये दरम्यान&comma; कोणाला उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तत्काळ सावलीत विश्रांती घ्यावी आणि आवश्यक असल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत&comma; असे आवाहन करण्यात आले आहे&period; वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून स्वतची व कुटुंबियांची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने अधोरेखित केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version