Home Latest News ८ महिन्यांपासून वाहतूक ठप्प, नागरिक त्रस्त, राजनेता मस्त

८ महिन्यांपासून वाहतूक ठप्प, नागरिक त्रस्त, राजनेता मस्त

0

<p><strong>&&num;8211&semi; रामटेक-चिंचाळा मार्गावरील झुकलेला पूल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सचिन चौरसिया&comma; à¤°à¤¾à¤®à¤Ÿà¥‡à¤• &colon;-<&sol;strong> रामटेक-काचुरवाही मार्गावर चिंचाळा गावाजवळ पेंच नहरच्या ३० व्या किलोमीटरवर असलेला पूल झुकल्याने मागील ८ महिन्यांपासून येथील वाहतूक पूर्णपणे बंद आहे&period; १३ सप्टेंबर रोजी पुलात भेगा पडून गंभीर तांत्रिक बिघाड आढळल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तत्काळ वाहतूक बंद केली होती&period; मात्र इतका कालावधी उलटूनही दुरुस्ती किंवा नव्या पुलाचे बांधकाम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे&period; सदर पूल सन १९८० मध्ये पेंच नहर बांधकामादरम्यान उभारण्यात आला होता आणि तो या भागातील प्रमुख दळणवळणाचा मार्ग होता&period; पूल बंद झाल्याने रामटेक&comma; काचुरवाही&comma; लोहडोगरी&comma; हातोडी&comma; खोडगाव&comma; किरणापूर&comma; दुधाळा&comma; बारसी&comma; तारसा व मौदा या गावांतील संपर्क मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे&period; नागरिकांना आता नवरगाव व संग्रामपूरमार्गे लांब व अरुंद पर्यायी रस्ता वापरावा लागत असून&comma; या मार्गाचीही दुरवस्था असल्याने वेळ व इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे&period; चिंचाळा येथील शेतकरी मिताराम सवालाखे व लोहडोगरी येथील दामोदर घरजाडे यांच्यासह अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली आहे&period; दरम्यान&comma; पुलाच्या कामात होत असलेल्या विलंबामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी&comma; अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>पेंच पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार नव्या पुलाचा प्रस्ताव प्रक्रियेत असून आराखडा तयार करून तो पीडब्ल्यूडी विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे&period; कामाला प्राधान्य देऊन लवकर पूर्ण केले जाईल&comma; असे अधिकाऱ्यांनी सांगितले&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;

Exit mobile version