Home Latest News नवेगावबांधच्या पर्यटनाला मिळणार जागतिक झळाळी; आमदार राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकाऱ्यांसोबत विशेष...

नवेगावबांधच्या पर्यटनाला मिळणार जागतिक झळाळी; आमदार राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक संपन्न

0

<p><strong>यासीन शेख&comma; गोंदिया &colon;- <&sol;strong>विदर्भाचा मानबिंदू असलेल्या नवेगावबांध पर्यटन स्थळाला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी आणि स्थानिक रोजगाराला नवी दिशा देण्यासाठी आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी कंबर कसली आहे&period; नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या विशेष बैठकीत नवेगावबांधच्या नियोजनबद्ध विकासाचा कालबद्ध आराखडा &lpar;Master Plan&rpar; निश्चित करण्यात आला असून&comma; यामुळे या परिसराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>उच्चस्तरीय बैठकीत विकासाचे मंथन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>नवेगावबांध पर्यटन संकुलाचा विकास हा तुकड्या-तुकड्यात न होता एका &&num;8216&semi;मास्टर प्लॅन&&num;8217&semi;नुसार व्हावा&comma; अशी आग्रही भूमिका आमदार बडोले यांनी मांडली होती&period; त्या अनुषंगाने दि&period; २४ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांच्या दालनात विशेष सभा पार पडली&period; या सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मृगनाथन&comma; प्रकल्प आराखडा इंजिनिअर सुनील तरोणे आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>काय आहे नवा विकास आराखडा&quest; &lpar;ठळक वैशिष्ट्ये&rpar;&colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>प्राणी संग्रहालयाचे पुनरुज्जीवन&colon; १९९० पूर्वी या ठिकाणी असलेले वैभव पुन्हा मिळवण्यासाठी जुन्या &&num;8216&semi;केजेस&&num;8217&semi;चे नूतनीकरण केले जाईल&period; वन्यजीव अनुसूची &lpar;Schedule&rpar; १ ते ६ मधील प्राणी वगळून&comma; इतर पशू-पक्षी आणि &&num;8216&semi;डोमेस्टिक बर्ड्स&&num;8217&semi; &lpar;Domestic Birds&rpar; यांचे आकर्षक संग्रहालय या ठिकाणी साकारले जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नैसर्गिक पायवाट व पर्यावरण शिक्षण&colon; संपूर्ण संकुल परिसरातून एक &&num;8216&semi;नॅचरल ट्रेल&&num;8217&semi; &lpar;नैसर्गिक पायवाट&rpar; तयार करण्यात येणार आहे&period; या माध्यमातून पर्यटकांना चालत फिरताना वनांचे महत्त्व आणि वन्य प्राण्यांच्या संवर्धनाचे धडे दिले जातील&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>रोप-वे आणि मिनी ट्रेन&colon;<&sol;strong> पर्यटकांचे मुख्य आकर्षण वाढवण्यासाठी हिल-टॉपपासून बोटिंग पॉईंटपर्यंत भव्य रोप-वे आणि तलावाच्या काठावरून निसर्गरम्य मिनी ट्रेन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>नूतनीकरण आणि सौंदर्यवर्धन&colon;<&sol;strong> ऐतिहासिक मनोहर गार्डनचे नूतनीकरण&comma; रॉक गार्डन ते संजय कुटीपर्यंत नैसर्गिक दगडी रस्ता आणि दुतर्फा रॉयल पाम ट्री लावून परिसराचे सुशोभीकरण केले जाईल&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>स्वागत द्वार व व्यावसायिक संधी&colon;<&sol;strong> नवेगावबांध टी-पॉईंटवर जागतिक दर्जाचे स्वागत द्वार उभारून&comma; स्थानिक लहान व्यावसायिकांसाठी &&num;8216&semi;हॉकर्स झोन&&num;8217&semi; &lpar;व्यापारी गाडे&rpar; बांधले जातील&comma; जेणेकरून स्थानिकांना थेट रोजगार मिळेल&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>जगाच्या नकाशावर नवेगावबांधचे स्वप्न<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>नवेगावबांधचा ३००० एकरचा जलाशय आणि समृद्ध वनसंपदा हे गोंदियाचे वैभव आहे&period; १९९० नंतरच्या उदासीनतेमुळे हे वैभव काहीसे झाकोळले गेले होते&period; मात्र&comma; आता आमदार बडोले यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी गोंदावले यांच्या नियोजनातून&comma; निसर्गाची हानी न करता B&period;O&period;T&period; &lpar;Build-Operate-Transfer&rpar; तत्त्वावर या स्थळाचा विकास करून महसूल वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या विशेष सभेमुळे नवेगावबांधच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळणार असून&comma; हे स्थळ केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशातील एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल&comma; अशी खात्री व्यक्त केली जात आहे&period; या नियोजित विकासामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील&comma; अशी आशा आता पल्लवित झाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8220&semi;नवेगावबांधचा विकास हा शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध आराखड्यानुसार व्हावा&comma; हे माझे आणि प्रत्येक पर्यटन प्रेमीचे स्वप्न आहे&period; विशेषतः जुन्या प्राणी संग्रहालयाचे स्वरूप बदलून ते पुन्हा सुरू केल्याने पर्यटकांचा ओघ वाढेल&period; जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या या सकारात्मक चर्चेमुळे हा प्रकल्प आता निश्चित वेळेत पूर्णत्वास जाईल&period;&&num;8221&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; आमदार राजकुमार बडोले<&sol;strong><&sol;p>&NewLine;

Exit mobile version