spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रात्रीच्या वेळीही अतिक्रमण निर्मुलन कारवाई करा – पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिले सहकार्याचे आश्वासन

– मनपाच्या “मिशन १०० डे” ला पोलीस विभागाचे पूर्ण सहकार्य   

नागपूर :- देशपातळीवर नागपूरची ओळख सुंदर शहर म्हणून आहे. अशात शहर सौंदर्यीकरणाला गालबोट लावणाऱ्या अतिक्रमणाला काढण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारा राबविण्यात येत असलेल्या “मिशन १०० डे” ला नागपूर पोलीस विभागाचे पूर्णतः सहकार्य राहणार असून, विविध ठिकाणी झालेल्या अतिक्रमणावर रात्रीच्या वेळी निर्मूलनाची कारवाई करण्यात यावी अशा सूचना पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.

शहरातील अतिक्रमण निर्मुलन कारवाई आणि मनपाच्या मिशन १०० डे संदर्भात पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या प्रमुख उपस्थित पोलीस मुख्याल्यातीत बैठक पार पडली. यावेळी शहरातील अवैद्य होर्डिंग सह फुटपाथ, विविध रस्त्यांवरील अतिक्रमण निर्मुलनासाठी नागपूर महानगरपालीकेद्वारा राबविण्यात येत असलेल्या “मिशन १०० डे” मोहिमे संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सहायक पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त सर्वश्री. वसंत परदेशी, राजेंद्र दाभाडे, डॉ. शिवाजी राठोड, पोलीस उपायुक्त(वाहतूक) लोहित मातानी यांच्यासह सर्व पोलीस उपायुक्त, मनपाचे उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त गणेश राठोड, उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम, धनंजय जाधव, नरेंद्र बावनकर,  घनश्याम पंधरे, विजय थूल, हरीश राऊत, अतिक्रमण विभागाचे सुनील कांबळे यांच्यासह मनपाचे अधिकारी पीडब्ल्यूडी चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत पोलीस आयुक्तांनी शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी अतिक्रमण निर्मुलन कारवाई, हॉकर्स व फेरीवाले यांना पर्यायी जागा देणे, जागा निश्चितीकरण, कायदेशीर कारवाई आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलनाची नियोजनबद्ध कारवाई करण्यासाठी वेळापत्रकानुसार पोलीस प्रशासनाला कळविण्यात यावे, शहरातील अनधिकृत फूड ट्रक, विशेषतः वस्तू विक्रीसाठी तयार केलेल्या वाहनांवर कारवाई करताना आरटीओच्या अधिकाऱ्यांना देखील सोबत घेण्याच्या सूचना दिल्या. अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी रोखण्यातही मदत मिळणार असल्याची भावना पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली.

बैठकीत मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी मिशन १०० डे मोहिमेंतर्गत करण्यात येत असलेल्या फुटपाथवरील अतिक्रमण काढणे, रस्त्यावरील अवैद्य बांधकाम काढणे, रस्त्यांवरील अवैद्य बांधकाम साहित्य काढणे, अवैद्य होर्डिंग काढणे आदी विषयांबद्दल सविस्तर माहिती दिली. यामोहिमेद्वारा नागरिकांना सुरक्षित, मोकळे आणि सुलभ रस्ते उपलब्ध होतील. फेरीवाले यांना कायदेशीर व सुरक्षित व्यवसायाची संधी मिळेल आणि शहरासाठी दीर्घकालीन सुधारणा व विकास आराखडा तयार करून नागपूरला स्मार्ट, सुव्यवस्थित आणि आधुनिक महानगर बनवण्याचा संकल्प पूर्ण होईल असेही आयुक्त डॉ. विपीन यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले.

बैठकीत उपायुक्त मंगेश खवले यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माधमातून मिशन १०० डे बद्दल माहिती दिली. उपायुक्त श्री. मंगेश खवले यांनी सांगितले की, मिशन १०० डे हे नागपूर शहरातील पदपथांवरील अतिक्रमण हटवून पादचान्यांसाठी सुरक्षित व मोकळे मार्ग निर्माण करण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. नागपूर महानगरपालिकेच्या प्रवर्तन विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश शहरी शिस्त प्रस्थापित करणे आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हा आहे.

Popular Articles