Friday, May 1, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नासाठी नगराध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या दारी, विद्युत दरामुळे शासन दरबारी प्रकल्प रखडला

खापा, वार्ताहर :- राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना खापा शहराचे नगराध्यक्ष पियुष बुरडे यांनी फेरो अलाॅय प्रकल्पाकरिता विद्युत दरात विशेष सवलत मिळण्यासाठी परस्पर भेट घेत निवेदन दिले.

मॉयल लिमिटेड नागपूर अंतर्गत येणाऱ्या खापा गुमगाव खान येथे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी फेरो अलाॅय प्लांट मंजूर झाले आणि त्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर शासनाच्या सर्व प्रक्रिया पूर्णकरीत प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्यात आली. तसेच पर्यावरण विभागाकडूनही याबद्दल सहमती मिळाली आहे. परंतु विद्युत विभागाकडून त्रासदी होत असल्याचा प्रश्न बुरडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडला.

सध्यास्थितीत विद्युत दरासाठी ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र शासन व औद्योगिक मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या मंजुरीकरिता फेरो अलाॅय प्लांट प्रस्ताव शासनाकडे रखडलेला आहे. विद्युत दराचा प्रश्न सोडविल्यास हा प्रकल्प चालू होण्यास दिरंगाई होणार नाही.

सदर प्रकल्प पूर्ण झाल्यास खापा शहरातील व परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. या प्रकल्पामुळे परिसरातील बेरोजगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल. याकरिता मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ही समस्या मांडत नगराध्यक्ष बुरडे यांनी शासन दरबारी रखडलेला हा प्रकल्प लवकरात लवकर प्रस्तावित करावे, अशी विनंती केली.

भविष्यात उद्भवणाऱ्या बेरोजगारीच्या प्रश्नावर आळा बसेल असे मत बुरडे यांनी मांडले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रश्नावर सहमती दर्शवत हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होईल, अशी ग्वाही दिली.

हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यास शहरातील आणि परिसरातील बेरोजगारीचा प्रश्न सुटेल आणि शहराच्या भरभराटीस सहकार्य होईल. या प्रकल्पामुळे आर्थिक सुबक्ता येईल. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शहरात व परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा जीवनास्तर उंचावेल. अशी भूमिका या अनुषंगाने नगराध्यक्ष पियूष बुरडे यांनी मांडली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.