– नागरिकांना दर्जेदार व वेळेत सेवा देण्याचे आरोग्य सभापतींचे निर्देश
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य सभापती सौ. मनीषा अतकरे, झोनल अधिकारी डॉ. ख्वाजा तसेच स्थानिक नगरसेवक दिवटे यांच्या उपस्थितीत संयुक्त नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, भांडेवाडी आणि आरोग्य व निरोगीपणा केंद्र, जय दुर्गा नगर येथे भेट देण्यात आली.
यावेळी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांचा तसेच औषधांच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांना दर्जेदार व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले.

